Rava Matar Sandwich Recipe In Marathi: अनेकदा नाश्त्यासाठी अेकदा काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. मुलांना डब्यात हेल्दी ऑप्शन काय द्यावे हेदेखील अनेकदा कळत नाही. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि हेल्दीदेखील आहे. चला तर मग, जाणून घेऊ या पौष्टिक रवा- मटार सॅंडविच’ घरच्या घरी कसे बनवायचे…
साहित्य
- 1/4 कप दही
- 1 वाटी हिरवा मटार
- लाल तिखट
- जीरे
- आले लसूण पेस्ट
- लसूण पाकळ्या
- हळद
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेला टोमॅटो
- इनो
- चवीनुसार मीठ
कृती
प्रथम सोललेले मटार दाणे स्वच्छ धुवून वाफवून घ्या. नंतर ते थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला एका भांड्यात १ कप रवा, पाव कप दही घेऊन चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून रवा फुगून येण्यासाठी २० मिनिटे झाकून ठेवा.
नंतर थंड केलेले मटार दाणे आणि लसूण मिक्सरला जाडसर वाटून घ्या. आणि तेलात जीरे फोडणी, चिरलेला कांदा, टोमॅटो परतवून वरील मटार मिश्रण हया मध्ये मिक्स करून वरून लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या.
आता गॅस चालू करून त्यावर पॅन मध्ये थोडे तेल गरम करून वरील रवा बॅटर मध्ये थोडा इनो घालून ॲक्टिव्ह करा. आणि बॅटर हलवून चमच्याने पॅन वर गोल पसरावे. आणि वरून आता मटारचा मिश्रण गोळा त्यावर थापून पुन्हा वरून रव्याचे बॅटर घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
तयार गरमागरम हेल्दी रवा मटार सॅंडविच. आता मधून कट करून वरून साॅस ओतून सव्हऀ करा.