Rava Palak Dosa Recipe In Marathi: डोसा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. बहुतेक लोकांच्या घरी नाश्त्यासाठी डोसा बनवला जातो. साधा डोसा, मसाला डोसा आपण अनेकदा घरी खातो. बाहेर रेस्ट्रॉरंटमध्येही खातो. पण तुम्ही कधी रवा पालक डोसा खाल्ला आहे का? हा डोसा चवीला फारच छान होतो व झटपट होतो. शिवाय पालक वापरल्याने जास्त हेल्दी पण असतो. मुलं पालक खात नसतील तर अशाप्रकारे आपण त्यांना खाऊ घालू शकतो. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊ या, रवा पालक डोसाची रेसिपी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

१ १/२ कप रवा

३/४ कप दही

१ कप पालक चिरलेला

२ हिरव्या मिरच्या

१ इंच आलं

मीठ चवीनुसार

१/२ टिस्पून बेकींग सोडा/ इनो

कृती

प्रथम पालक, रवा, दही हे साहित्य एका डिशमध्ये काढून घ्या. पालक स्वच्छ धुऊन चिरून घ्या.

मग मिक्सरच्या जारमध्ये रवा, पालक, दही हिरव्या मिरच्या, आले सर्व घाला. त्याची फाईन पेस्ट करून घ्या व डोसा करण्यासाठी गरजेनुसार पाणी घातले. तसेच त्यात मीठ व बेकिंग सोडा घालून दोन्ही मिक्स करून घ्या.

आता गॅसवर पॅन गरम करून त्यावर बॅटर घालून पसरवा व डोसा दोन्ही बाजूने शेकून घ्या.

या डोशाच्या बॅटरमधे दही असल्यामुळे पॅनला तेल, तुपाने ग्रीसिंग करायची गरज पडत नाही.

तयार रवा पालक डोसा डिशमधे ठेवून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.