Raw Banana Fry Recipe : वरण-भाताबरोबर आवडीची भाजी नसेल तर आपण लोणचं, पापड, किंवा दुकानातून चिप्स आणून खातो. पण, तुम्हाला वरण-भाताबरोबर काहीतरी चटपटीत, खमंग आणि हेल्दी खावंसं वाटत असेल तर तुम्ही कच्च्या केळीचे तिखट काप करू शकता. सोशल मीडियावर एका युजरने या पदार्थाची सोपी रेसिपी दाखवली आहे. चला तर पाहुयात कच्च्या केळीचे काप कसे बनवायचे ते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य (Raw Banana Fry Ingredients) :

कच्ची केळी

मिठाचे पाणी

हळद

तिखट

धने पावडर

जिरेपूड

चाट मसाला

काळी मिरी पावडर

एक चमचा बेसन

एक चमचा रवा

एक चमचा तांदळाचे पीठ

मीठ

हेही वाचा…Aloo Paneer Donuts : बटाटा, पनीरपासून बनवा मऊसूत डोनट्स; रेसिपी एकदम सोपी, मुलंही आवडीनं खातील

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Raw Banana Fry) :

कच्ची केळी घ्या आणि त्याची साल काढून घ्या.

त्यानंतर कच्ची केली मिठाच्या पाण्यात टाका.

पाण्यातून काढल्यानंतर कच्ची केली उभी कापून घ्या.

नंतर पुन्हा त्याच मिठाच्या पाण्यात टाका.

त्यानंतर एका भांड्यात मीठ, हळद, तिखट, धने पावडर, जिरेपूड, चाट मसाला, काळी मिरी पावडर, एक चमचा बेसन, इज चमचा रवा आणि एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.

आता कच्या केळीचे तुकडे या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करा आणि कुरकुरीत आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

अशाप्रकारे तुमचे कच्च्या केळीचे काप तयार (Raw Banana Fry).

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @myflavourfuljourney या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

कच्या केळीचे आरोग्यदायी फायदे

केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे. केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व आणि जीवनसत्व आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने केळ हे उत्तम फळ मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत कच्ची केळी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे कच्या केळीपासून तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून पाहा आणि वरण-भाताची रंगत देखील वाढवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raw banana fry how to make spicy and crispy recipe at home then note down the marathi recipe asp