Raw Banana Recipe In Marathi : केळी हे अनेकांचे आवडते फळ आहे, केळ्यांमध्ये भरपूर पोषक तत्व, जीवनसत्व आढळतात. पण तुम्हाला माहितेय का कच्ची केळी खाणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, म्हणून अनेक गृहिणी कच्च्या केळीपासून अनेक पदार्थ बनवतात. कच्च्या केळीपासून वेफर्स, काप, भजी, चटणी, कटलेट, आदी अनेक पदार्थ बनवले जातात. तर आज आपण कच्च्या केळीपासून (Raw Banana Recipe) एक आगळावेगळा पदार्थ बनवायला शिकणार आहोत. कसा बनवायचा हा पदार्थ ? चला जाणून घेऊ या…

साहित्य :

१. तीन केळी
२. काश्मिरी मिरची पावडर
३. आमचूर पावडर
४. चाट मसाला
५. काळं मीठ
६. तेल
७. पाणी

हेही वाचा…Chana Koliwada : कुरकुरीत ‘चना कोळीवाडा’ कसा बनवायचा माहिती आहे का? मग ‘ही’ सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या…

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. तीन कच्ची केळी घ्या.
२. पाण्यात ५ ते ६ मिनिटे कच्ची केळी उकडवून घ्या.
३. त्यानंतर त्याचे साल काढून टाका.
४. त्यानंतर केळीचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या.
५. नंतर कढईत तेल घ्या.
६. ५ ते ६ मिनिटे हे केळीचे काप फ्राय करून घ्या.
७. नंतर एका प्लेटमध्ये घ्या आणि एका सहाय्याने हे केळीचे काप प्रेस करून घ्या.
८. प्रेस केल्यानंतर पुन्हा एकदा तेलात सोडा.
९. सोनेरी रंग आल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून काश्मिरी लाल तिखट, आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ घाला.
१०. अशाप्रकारे तुमचा कच्च्या केळीपासून बनवलेला स्नॅक्स (Raw Banana Recipe) तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @desi_recipes या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओमधून तुम्ही हा पदार्थ कसा बनवला याची झलक पाहू शकता.

कच्च्या केळीचे आरोग्यदायी फायदे :

कच्च्या केळ्यामध्ये असणारे फायबर पचनक्रियेसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कच्ची केळी खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.केळ्यांमध्ये आढळणारे विटामिन बी६ मधुमेह आणि मधुमेहाच्या सीमारेषेवर असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात ग्लुकोज रेग्युलेट करण्यास फायदेशीर मानले जाते.