तुम्हाला लोणचं खायला आवडतं का? तुमचे उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कित्येक लोक असे आहेत ज्यांना लोणच्याशिवाय जेवण जाक नाही. तुम्ही आता पर्यंत कैरीचे, लिंबाचे किंवा मिर्चीचे लोणचं खाल्ले असेल पण आज आम्ही तुम्हाला गाजराचे लोणचं कसं तयार करायचे हे सांगणाग आहे. गाजर हे षौष्टिक आहेच पण त्याचं लोणचं अतिशय चवदार असते. गाजराचं लोणचं तयार करणं तसे अगदी सोपे काम आहे आणि फार कमी वेळात ते तयार केले जाते. गाजराचं लोणंच बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ या.
गाजराचं लोणचं रेसिपी
गाजराचं लोणचं बनवण्यासाठी साहित्य
गाजर – १ किलो
हळद पावडर – १ टीस्पून
लाल तिखट – २ टीस्पून
जिरे – २टीस्पून
बडीशेप – २ टीस्पून
मेथी दाणे – १ टीस्पून
मोहरी – १ टेस्पून
आमचूर – १ टीस्पून
मोहरीचे तेल – 300 ग्रॅम (आवश्यकतेनुसार)
मीठ – १ वाटी (चवीनुसार)
हेही वाचा तळल्यानंतर पनीर कडक होतेय? हे ४ सोपे उपाय वापरून पाहा, रेस्टॉरंटसारखी टेस्टी होईल प्रत्येक रेसिपी
गाजराचं लोणचं तयार करण्याची कृती
गाजराचे लोणचं तयार करण्यासाठी सर्वात आधी ताजे गाजर घ्या आणि त्यांना धूवून साल काढून ठेवा. त्यानंतर त्याचे पातळ आणि लांब तुकडे कापून घ्या.
आता कापलेल्या गाजराला एका मोठ्या भांड्यामध्ये टाका आणि त्यामध्ये हळद आणि स्वादानुसार मीठ टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्याय ताही वेळ व्यवस्थित एकत्र करत राहा जेणेकरून गाजराला मीठ आणि तिकट व्यवस्थित लागेल.
आता एका कढईत मोहरी, जीरा, मेथी दाणे आणि बडिशेप टाकून मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. सर्व मसाले साधारण १ मिनिटांपर्यंत चांगले भाजून ध्या आणि गॅस बंद करा आणि हे सर्व मसाले मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता वाटेलेला मसाला गाजराच्या भांड्यात टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
हेही वाचा – तुम्ही कधी व्हेजिटेरिअन फिश फ्राय खाल्ला आहे का? नाव ऐकून गोंधळून जाऊ नका, आधी संपूर्ण रेसिपी वाचा
त्यानंतर एका कढईत मोहरीचे तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल चांगले गरम झाले की गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. जेव्हा तेल कोमट होईल तेव्हा त्याला गाजराच्या लोणच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करा. आता लोणचं एका काचेच्या बरणी काढा. आता चमच्याने लोणच्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करा. अशा प्रकारे करा चवदार गाजराचे लोणचं तयार आहे.