स्वादिष्ट सामिष : दीपा पाटील
ग्रेवी – ३ मोठे कांदे, ३ मोठे टोमॅटो, ५ लसूण पाकळ्या, २ इंच आले, ४ लहान वेलची, १ इंच दालचिनी, ४ लवंग, ४ चमचे मावा.
इतर मसाल्यांचे साहित्य -२ चमचे मिरची पूड, २ चमचे धने पूड, २ चमचे किचनकिंग, १ चमचा गरम मसाला, १ चमचा कसुरी पूड, पाव चमचा वेलची पूड, १ कप दही, पाव कप बटर, मीठ, १ कप तळलेले काजू-बदाम पेस्ट (आवडत असल्यास केवडा पाणी, गुलाब पाणी)
सजावटीसाठी – चांदीवर्क, केशर, पिस्ता काप, बदाम काप, ताजी साय
साहित्य : अर्धा किलो बोनलेस चिकन, २ चमचे आले-लसूण पेस्ट, ४ चमचे दही, १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरपूड, २ लिंबाचा रस.
कृती
सगळ्यात आधी चिकनला आले लसूण पेस्ट, दही, चाट मसाला, मिरपूड आणि लिंबाचा रस लावून १ तास फ्रीजमध्ये ठेवावे आणि नंतर ते छान ग्रील करून घ्यावे. आता ग्रेव्हीसाठीचे सर्व साहित्य ४ चमचे तेलावर परतवून मग वाटून घ्यावे. एका पातेल्यात तेल अथवा तूप गरम करावे. त्यात वाटलेली ग्रेव्ही घालावी आणि चांगले परतावे. एका पातेल्यात तेल अथवा तूप गरम करावे. त्यात वाटलेली ग्रेवी घालून चांगली परतून घ्यावी. यानंतर अर्धा कप पाण्यात २ चमचे मिरची पूड, २ चमचे धने पूड, २ चमचे किचनकिंग, १ चमचा गरम मसाला, १ चमचा कसुरी पूड, पाव चमचा वेलची पूड मिसळून ते ग्रेव्हीमध्ये टाकावे. यामध्ये दही चांगले फेटून घालावे आणि तळलेली काजूंची पेस्ट घालावी. शेवटी ग्रील चिकनचे अर्धे तुकडे कापून ते ग्रेव्हीमध्ये मिसळावे. त्यात केवडय़ाचे पाणी आणि ताजी साय घालावी. गॅस बंद करावा आणि नंतर उरलेल्या पिसला चांदीचा वर्क लावून सव्र्ह करावे.