Ragi Vadi Recipe: नाचणीला अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक पोषकद्रव्यं असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाचणी-सोयाबीनचा वडी कशी करतात हे सांगणार आहोत.
नाचणीची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ कप नाचणीचे पीठ
- २ कप सोयाबीनचे पीठ
- १ कप तूप
- १/२ कप जाड पोहे
- १/२ कप डिंक
- १/२ कप जाड किसलेलं सुकं खोबरं
- १ चमचा वेलची पावडर
- ४ कप गूळ
नाचणीची वडी बनवण्याची कृती:
हेही वाचा: २ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी कढईत तूप वितळवून त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्या.
- त्यानंतर एका ताटात या दोन्ही गोष्टी काढून चुरून घ्या.
- आता त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि सोयाबीनचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या. गरज लागल्या त्यात आणखी तूप घाला.
- आता ३ चमचे पाणी आणि किसलेला गूळ आणि एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा.
- गूळ पूर्ण वितळला की एक उकळी येऊ द्यावी आणि त्यात भाजलेले पीठ, डिंक, पोहे, खोबरं, आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
- हे मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतून त्याच्या वड्या पाडा.
- तयार नाचणीच्या वडीचा आस्वाद घ्या.