Cheesy Sandwich Bites Recipe: पावसाळ्याचा मोसम सुरू असताना नेहमीच काहीतरी गरमागरम, कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. म्हणूनच आजची रेसिपी थोडी खास आहे. झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीने नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग ‘चीजी सॅंडविच बाईट्स’ (Cheesy Sandwich Bites Recipe) तयार करायलाच घेऊ.
चीजी सॅंडविच बाईट्सचे साहित्य (Cheesy Sandwich Bites Ingredients)
- ६ ब्रेड
- २ ब्रेडचे ब्रेड क्रम्ब्स (ब्रेडचा चूरा)
- बारीक चिरलेल्या भाज्या
- १/४ कप- मोझेरेला चीज
स्लरी साठीचं साहित्य
- १/४ कप- मैद्याचं पीठ
- १/४ कप- मक्याचं पीठ
- १/४ टीस्पून- मीठ
- १/४ टीस्पून- काळी मिरी पावडर
चीजी सॅंडविच बाईट्स बनवण्याची कृती (Cheesy Sandwich Bites Recipe)
१. प्रथम दोन बटाटे उकडून घ्यावेत. नंतर, कांदा, गाजर , शिमला मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आता एका बाऊलबध्ये ते दोन उकडलेले बटाटेघ्यावेत त्यावर चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तसेच त्यावर १/४ कप मोझेरेला चीज, हळद, मसाला, मीठ घालून फोर्कच्या मदतीने त्याचा लगदा करून घ्यावा.
२. ब्रेडच्या एका बाजूला हे एकजीव केलेले मिश्रण लावून घेणे आणि त्या ब्रेडचे चार भाग करून घेणे.
३. मक्याचं पीठ आणि मैद्याचं पीठ मिक्स करून त्यात रेड चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर आणि १ कप पाणी घालून याचे पातळ मिश्रण (Slurry) तयार करून घेणे.
४. या पातळ मिश्रणात स्लाईस केलेले ब्रेडचे तुकडे व्यवस्थित बुडवून घ्यावेत.
५. त्यानंतर हे तुकडे ब्रेड क्रम्ब्समध्ये टाकून मिक्स करून घ्यावे.
६. शेवटी तयार झालेले ब्रेडचे तुकडे तेलात कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावेत.
चीजी सॅंडविच बाईट्स रेसिपी व्हिडीओ (Cheesy Sandwich Bites Recipe Video)
*ही रेसिपी ‘foodklick‘ या इन्स्टाग्राम पेजवरून घेण्यात आलेली आहे.