परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

साहित्य

  •  २२० ग्रॅम राजमा
  •  १ चमचा ऑलिव्ह तेल
  •  १ चमचा हरिस्सा पेस्ट
  •  २ मध्यम आकाराचे कांदे (उभे चिरलेले)
  •   दीड चमचा ताहिनी पेस्ट
  •  गार्लिक पेस्ट
  •   चिमूटभर मीठ
  •   काळीमिरी पूड
  •   मूठभर पार्सली बारीक चिरलेली
  •  १ चमचा लिंबाचा रस.

कृती

पहिल्यांदा राजमा कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. एका खोलगट तव्यावर तेलामध्ये उभा चिरलेला कांदा तळून घ्यावा. तो बाजूला काढून ठेवावा. आता याच भांडय़ात ताहिनी पेस्ट आणि लसूण पेस्ट घालून २ मिनिटे परतून घ्यावे. नंतर गॅस बंद करून त्यात १ चमचा लिंबूरस घालावा. आपला ताहिनी सॉस तयार झाला.

दुसऱ्या एका भांडय़ात तेल घालून त्यात हरिस्सा पेस्ट घालावी. त्यात राजमा घालून परतून घ्यावे. त्यावर काळीमिरी पूड आणि मीठ भुरभुरावे. आता आच बंद करून राजम्यावर बारीक चिरलेली पार्सली, तळलेला कांदा पेरावा. ताहिनी सॉस घालून हे खायला घ्यावे. राजम्याऐवजी तुम्ही मूगसुद्धा वापरू शकता.

nilesh@chefneel.com