|| अलका फडणीस
साहित्य
शेवळ २ जुडय़ा, काकड ४-५, हळद अर्धा चमचा, तिखट १ चमचा, चिंचेचा कोळ २-३ चमचे, कांदा १ बारीक चिरलेला, आलं-लसूणाचं वाटण २ चमचे, तेल अर्धी वाटी, तळलेला मसाला १ मोठा चमचा.
कृती
प्रथम शेवळ आणि काकड नीट धुऊन घ्या. शेवळाचे साल आणि आतला पिवळा किंवा शेंदरी भाग काढून टाका. शेवळ बारीक चिरा. काकड ठेचून बिया काढून टाका आणि मिक्सरमधून काढा. पातेल्यात तेल टाकून त्यावर हिंग घालून वर शेवळ घाला आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यावर वाटलेली काकड, कांदा, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून भाजी शिजवून घ्या. भाजी शिजल्यावर तळलेला मसाला, गूळ आणि मीठ घालून भाजी चांगली उकळवा.