लाल मिरची पावडर हा आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे, त्याशिवाय आपण अनेक स्वादिष्ट पदार्थांची कल्पना करू शकत नाही, भाज्या, मांसाहारी पदार्थ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये लाल मिरची पावडर वापरली जाते. आधीच्या काळात लाल मिरच्या बाजारातून विकत आणल्या जायच्या आणि मग त्या दगडाच्या गाळ्यात बारीक करून त्याची पावडर तयार केली जायची, पण सध्या वेळेअभावी लोक बाजारातूनच लाल मिरची पावडर विकत घेऊ लागले. बाजारात उपलब्ध असलेल्या या मसाल्यामध्ये भेसळ होण्याची भीती नेहमीच असते त्यामुळे ही काश्मिरी लाल मिरची पावडर घरच्या घरी आणि अगदी काही वेळात बनवा. चला तर पाहुयात याची झटपट रेसिपी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मिरी मिरची पावडर साहित्य –

छोटी वेलची – १ टेबलस्पून
जायफळ पावडर – १/४ टीस्पून
दालचिनी – २ इंच
जिरे – १/२ टेबलस्पून
शाही जिरे – १/२ टीस्पून
लवंग – १/२ टीस्पून
गदा – २ तुकडे
काळी मिरी – १ टेबलस्पून
बडीशेप – १/२ टेबलस्पून

काश्मिरी मिरची पावडर कृती –

  • सर्व प्रथम सर्व मसाले उन्हात वाळवा.
  • त्यानंतर गॅसवर पॅन ठेवा. सर्व साहित्य एक एक करून मंद आचेवर तळून घ्या.
  • थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. सर्व मसाले ग्राइंडरमध्ये एकत्र ठेवा आणि ३ मिनिटे हाय स्पीडवर बारीक करा.

हेही वाचा >> सातारा, कोल्हापूर स्पेशल “घाटी” मसाला आता घरीच बनवा; १ किलोच्या प्रमाणात…जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

  • अशाप्रकारे काश्मिरी गरम मसाला पावडर तयार आहे
  • ही मसाला पावडर हवाबंद डब्यात साठवा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red chilli powder recipe in marathi kashmiri lal mirch powder recipe ingredients list srk
Show comments