ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

मध्यम आकाराच्या कोलंबी १८-२० सोलून घ्या. २ चमचे तूप, १ मोठा कांदा बारीक चिरलेला, ५-६ लसूण पाकळ्या, १ टेबलस्पून जिरे, २ चमचे लाल मिरच्यांची पेस्ट, २ चमचे धने-जिरे पूड, चवीपुरते मीठ, १ चमचा टोमॅटो सॉस, १ चमचा सफेद व्हिनेगर, २ चमचे चिरलेली कोथिंबीर.

कृती

पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरे टाका. मग ठेचलेला लसूण घाला. त्यावर चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यावर मिरची पेस्ट, धनेजिरे पूड घालून परता. यावर कोलंबी घाला. मीठ घालून ढवळा. थोडेसे पाणी घालून ५-६ मिनिटे शिजू द्या. त्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घ्या. शिजल्यावर टोमॅटो सॉस, सफेद व्हिनेगर त्यात मिसळा. मग वरून कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा. गरमागरम भाकरीसोबत या लाल कोलंबीवर ताव मारा.

Story img Loader