– डॉ. सारिका सातव
साहित्य
आणखी वाचा
* मध्यम आकाराचा कांदा १
* गाजर ५ (बारीक तुकडे करून)
* लसूण पाकळ्या ३
* लाल भोपळा ३ वाटी (तुकडे करून)
* २ मोठे चमचे ओलिव्ह ऑइल
* सैंधव, मीरपुड चवीनुसार
* १ चमचा हळद
* भाज्या शिजविलेले पाणी
कृती
* भाज्या शिजविलेले पाणी आणि आले उकळून घ्यावे,
* चिरलेला भोपळा, गाजर, कांदा कढईमध्ये तेल, मीरपूड, लसूण, हळद इ.मध्ये चांगले परतून घ्यावे.
* मिश्रण चांगले मऊ होईपर्यंत तेलात परतावे.
* हे मऊ झालेले मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून भाज्यांच्या पाण्यामध्ये मिसळावे.
* आवडीनुसार घट्ट / पातळ करावे.
एक उकळी आणून कोथिंबीरने सजवून घ्यावे.
उपयुक्तता
* ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात
* चवीस उत्तम
* भूक वाढते.
* वजन कमी करणाऱ्यांसाठी घट्ट सूप जास्त प्रमाणात जेवणाऐवजी घ्यावे
* आबालवृद्धासाठी उपयुक्त