नॉनव्हेज डिशचं केवळ नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटते ना. नॉनव्हेजमधील एखादी नवीन चटपटीत डिश तुम्हाला खायला आवडेल का? आम्ही आज तुम्हाला केरळ स्पेशल चिकन सॅलडची रेसिपी सांगणार आहोत. ही डिश घरच्या घरी अगदी सहजरित्या तयार करता होते. डिनर पार्टीसाठीही तुम्ही केरळ स्पेशल रोस्टेड चिकन सॅलडचा बेत आखू शकता. नुसतं किंवा पोळीसह या चविष्ट पदार्थाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.
रोस्टेड चिकन सॅलड साहित्य
२०० ग्रॅम बोलले चिकन
१ चमचा मसाला
१/२ चमचा हळद
१ चमचा काळामीरी पावडर
१ बाऊल सलाड (कांदा,टोमॅटो,कोबी, शिमला मिरची)
२मचमचे तेल
३ चमचे दही
रोस्टेड चिकन सॅलड कृती
प्रथम बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत तसेच सलाड पण बारीक कापून घ्यावी चिरलेल्या चिकन मध्ये मीठ,मसाला, हळद,मिरी पावडर व आले-लसूण ची पेस्ट घालावी. मॅरीनेट करून ठेवावे.
यानंतर पॅनमध्ये चिकन आणि बेडगी मिरचीची पेस्ट मिक्स करा. आठ ते दहा मिनिटांसाठी मिश्रण शिजू द्यावे. पॅनमध्ये थोडे पाणी घालून सामग्री ढवळून घ्यावी. चिकन चांगल्या पद्धतीने शिजून मऊ होऊ द्यावे.मॅरीनेट केलेले चिकन गॅसवर तवा ठेवून थोडेसे तेल घालावे व ते चांगले शिजवून घ्यावे.
चिकनमध्ये तूप किंवा बटर मिक्स करा. म्हणजे चिकनची चव आणखी वाढेल.
हेही वाचा >> घरी बनवा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन; ताट पुसून खाल अशी कधीच न खाल्लेली चिकन रेसिपी
चिकन चांगले फ्राय झाल्यावर त्यात बारीक कापलेले सलाड घालावे व त्याला पण एक वाफ येऊ द्यावी त्यानंतर त्याच्यावर दही घालावे व सर्व एकजीव करावे.