Roti Besan Pakode Recipe In Marathi : पावसाळा असो हिवाळा असो किंवा उन्हाळा कोणी तुमच्यासमोर कोणतीही भजी आणली तरी तुम्ही नाही म्हणणार नाही. या भजीमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात… बटाटा, कांदा, पालक भजी, चायनिज भजी आदींचा यात समावेश असतो. पण, तुम्ही कधी पोळीचा बेसन पकोडा बनवून पाहिली आहे का? नाही… तर चवीला कुरकुरीत पकोडा (Roti Besan Pakode) खाल्ल्याने तुमचं पोट नक्की भरेल. चला तर पोळीचा बेसन पकोडा कसा बनवायचा ते पाहूया…

साहित्य ( Roti Besan Pakode Ingredients) :

१. बेसन
२.कांदा
३.हिरवी मिरची
४. कोथिंबीर
५. लाल तिखट
६. गरम मसाला
७. ओवा
८. मीठ
९. पोळी
१०. तेल

poha premix
Viral Video : दोन वाटी पोह्यामध्ये गरम पाणी टाका अन् पाहा कमाल
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”
Pune shop owner advertise for Renting shop in Puneri way puneri poster goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार लग्न; म्हणाली, “फेब्रुवारीच्या आधी…”
Lunch Recipe in marathi Veg Recipe gavran dudhichi bhaji recipe in marathi
भोपळ्याची आंबट-गोड भाजी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी रेसिपी
How to Make Potato Breakfast,
कच्चा बटाटा व गव्हाच्या पिठाचे बनवा खमंग अन् कुरकुरीत नाश्ता, तेही फक्त १० मिनिटांत
Raw Banana Snacks Recipe In Marathi
Raw Banana Recipe : कच्च्या केळीपासून बनवलेला हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? मग रेसिपी लगेच लिहून घ्या

हेही वाचा…Mix Vegetable Pickle : तोंडी लावायला ५ मिनीटांत करा मिक्स भाज्यांचं चमचमीत लोणचं; आंबट-गोड, चटपटीत लोणचं तुमच्या जेवणाची रंगत वाढवेल

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (How To Make Roti Besan Pakode) :

१. कढईत तेल गरम करायला ठेवा.
२. दुसरीकडे एका भांड्यात बेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३. मीठ, लाल तिखट, गरम मसाला, ओवा आणि थोडं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
४. त्यानंतर पोळीचे पिझ्झाप्रमाणे चार भाग कापून घ्या.
५. तयार मिश्रणात पोळीचा एकेक भाग बुडवून घ्या आणि तेलात सोडा.
६. तेलात कुरकुरीत तळून घ्या.
७. अशाप्रकारे पोळीचा बेसन पकोडा (Roti Besan Pakode) तयार.
८. तुम्ही पोळीचा बेसन पकोडा सॉसबरोबर खाऊ शकता.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @food.in.minutes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ऑफिसवरून घरी येताना, खूप लागते तेव्हा आपण येताना पाणीपुरी, शेवपुरी खातो. तर रोज-रोज बाहेरचे जंक फूड खाण्यापेक्षा तुम्ही घरी हेल्दी आणि टेस्टी पोळीचा बेसन पकोडा (Roti Besan Pakode) बनवू शकता. यासाठी जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि संध्याकाळी चहाबरोबर तुम्हाला काहीतरी चटपटीत सुद्धा खायला मिळेल. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला देऊ शकता.