Rumali Vadi Recipe In Marathi: संध्याकाळ झाल्यावर लोक कामावरुन घरी येतात. अशा वेळी चहासह नाश्ता म्हणून काहीतरी चविष्ट पदार्थ मिळाला तर खूप जास्त आनंद होतो. सामान्यत: पोहे, शिरा, उपमा वगैरे पदार्थ सकाळी नाश्त्याला बनवले जातात. काहींच्या घरी संध्याकाळी देखील हे पदार्थ खाल्ले जातात. कधीकधी मराठी घरांमध्ये कांदाभजी, बटाटावडा किंवा बटाटाभजी यांचा खमंग बेत केला जातो. पण हे पदार्थ आपण नेहमीच खात असतो. त्यामुळे काहीतरी वेगळं खायला मिळावं असेही प्रत्येकाला वाटत असते. अशा वेळी तुम्ही रुमाली वडी हा पर्याय निवडू शकता. कोथिंबीर वडीसारखा दिसणारा हा पदार्थ तितचा खमंग आणि कुरकुरीत असतो. पण ही वडी बनवायची कशी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर खास खवय्यांसाठी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घे गोड आप्पे ही सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.
साहित्य :
- २ वाट्या डाळीचे पीठ
- अर्धा चमचा हळद
- १ चमचा तिखट
- पाव वाटी नारळाचे दूध
- १ चमचा धणे-जिरे पूड
- तेल तळण्यासाठी
- ३ वाट्या पाणी
- स्वच्छ रुमाल
सारणासाठी (हे सर्व साहित्य एकत्र करून ठेवा.)
- २ वाट्या ओलं खोबरं (थोडंसं भाजून घ्या)
- १ चमचा खसखस (भाजलेली)
- १ वाटी कोथिंबीर (बारीक चिरून),
- २ चमचे लिंबाचा रस
- मीठ आणि साखर चवीप्रमाणे
कृती :
डाळीच्या पिठात हळद, तिखट, मीठ, साखर, नारळाचे दूध आणि पाणी घालून मिश्रण तयार करा.
गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर गॅसवर ठेवून सतत ढवळत राहा.
घट्ट झाल्यावर पातेल्याखाली जाड तवा ठेवून झाकण ठेवून त्याला वाफ आणावी.
स्वच्छ रुमाल ओला करून पसरा. त्यावर अर्धे मिश्रण घालून नीट पसरवा.
त्यावर खोबऱ्याचे सारण पसरून हलक्या हाताने ओल्या रुमालाच्या मदतीने गुंडाळी करा.
त्याला त्रिकोणी आकार देऊन फ्रिजमध्ये ठेवून थंड करा म्हणजे नीट वड्या पडतील.
वड्या पाडून तळून खायला द्या.
आणखी वाचा – संध्याकाळी नाश्त्याला काहीतरी गोड खायचंय? झटपट बनवा गोड कुरकुरीत आप्पे, वाचा सोपी रेसिपी
(टॉमेटो सॉस किंवा हिरव्या चटणीसह ही वडी खाल्ली जाते. हा पदार्थ गरम असताना फार चविष्ट लागतो. आपल्याकडे नाश्ता, जेवण रुमाली वडी कधीही खाल्ली जाते.)