Sabudana bhajji Recipe : उपवासाला वेगळं काय करावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. जर तुम्ही साबुदाणा खिचडी, भगर, साबुदाणा वडा खाऊन कंटाळला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही उपवासाचे भजी कधी खाल्ली आहे का? आज आम्ही तुम्हाला उपवासाची भजी कशी बनवायची, हे सांगणार आहे.
बटाटा, साबुदाणा आणि भगर पासून ही कुरकुरीत भजी करू शकता.उपवासासाठी तुम्ही ही हटके रेसिपी करू शकता. ही भजी अत्यंत चविष्ठ वाटतात. त्यामुळे उपसाला साबुदाणा खिचडी, भगर खाण्याऐवजी ही साबुदाण्याची कुरकुरीत भजी बनवा. तुम्हाला ही भजी खूप आवडेल. काही लोकांना एकदा खाल्यानंतर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. ही भजी कशी करायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर टेन्शन घेऊ नका. ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

  • बटाटा
  • साबुदाणा
  • भगर/वरई
  • हिरवी मिरची
  • आले
  • जिरे
  • मीठ
  • तेल

हेही वाचा : Rava Uttapam : फक्त दहा मिनिटांमध्ये बनवा रव्याचा उत्तपा, सकाळच्या नाश्त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरूवातीला बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
  • त्यानंतर बटाट्याचे साल काढून घ्या
  • त्यानंतर बटाटे पुन्हा स्वच्छ पाण्याने दोनदा धुवून घ्या.
  • त्यानंतर बटाटा उभा पकडा आणि किसून घ्या.
  • किसलेल्या बटाट्याला दोनदा स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घ्या.
  • त्यानंतर बटाट्याचा किस एका भांड्यात टाका.
  • त्यानंतर साबुदाणा कमी आचेवर चांगला भाजून घ्यावा आणि हा भाजलेला साबुदाणा मिक्सरमधून बारीक करा.
  • त्यानंतर भगर सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून वाळवून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करा.
  • या बटाट्याच्या किसमध्ये बारीक केलेला साबुदाणा आणि भगर टाका.
  • हे मिश्रण चांगले एकत्र करा.
  • त्यानंतर हिरवे मिरची, जिरे, आले घालून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट त्या मिश्रणात टाका.
  • त्यात चवीनुसार मीठ घाला.
  • हे मिश्रण मळून घ्या. पाण्याचा अजिबात वापरू नका.
  • गॅसवर एका कढईत तेल गरम करा.
  • या गरम तेलातून या मिश्रणाची भजी तेलात सोडा.
  • कमी आचेवर कुरकुरीत भजी तळून घ्या.
  • ही भजी तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabudana bhajji recipe how to make crispy sabudana pakora for fast recipe in marathi ndj