– शुभा प्रभू साटम
साहित्य :
* अर्धी वाटी साबुदाणा,
* १ वाटी इडलीचा रवा,
* पाव वाटी गोड दही,
* साखर,
* मीठ.
कृती
* साबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करा.
* त्यात किंचिंत साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा.
* दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या करा.
* हवे असल्यास अधिक पाणी घालून घ्या.
* नेहमीच्या इडलीला कंटाळला असाल तर हा वेगळा प्रयोग नक्की करून पाहा.