Tips for Sabudana Khichdi : उपवास असला की आपण आवडीने साबुदाणा खिचडी करतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपवासाला न चुकता साबुदाणा खिचडी हवी असते. अनेकदा साबुदाणा खिचडी मोकळी किंवा सुटसुटीत होत नाही. खिचडी चिकट होते. तुमचीही खिचडी मोकळी होत नाही का? टेन्शन घेऊ नका आज आपण मऊ व मोकळी अशी साबुदाणा खिचडी कशी बनवायची, याबाबत काही टिप्स जाणून घेणार आहोत.

सोशल मीडियावर साबुदाणा खिचडी कशी बनवायची, याविषयी अनेक टिप्स सांगितल्या जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये साबुदाणा खिचडी मऊ व मोकळी होण्यासाठी खास टिप्स सांगितल्या आहेत. आज आपण त्या जाणून घेऊ या. (tips for Sabudana Khichdi)

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

  • साबुदाणा खिचडी मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा नीट भिजवून घ्यायचा. साबुदाणी दोन तीनदा धुवून पूर्ण पाण्यात साबुदाणा बुडेल, एवढे पाणी घालायचे.
  • साबुदाण्याला सात आठ तास किंवा रात्रभर भिजवून ठेवायचा. साबुदाणा भिजवल्यानंतर जास्त पाणी झाले तर साबुदाणा चाळणीमध्ये काढून फॅनच्या हवेमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर खिचडी बनवायची.
  • खिचडी बनवताना शक्यतो जाड कढईचा वापर करायचा. त्यामुळे खिचडी चांगली भाजली जाते आणि मऊ व्हायला मदत होते. साबुदाणा मोकळा करूनच मग कढईमध्ये घालायचा.
  • शेंगदाण्याचे कुट वापरताना जाडसर कुट त्यामध्ये वापरायचे त्यामुळे खिचडी छान मोकळी होते.
  • खिचडी भाजल्यानंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. यामुळे मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी तयार होते.

हेही वाचा : Medu Vada Recipe : डाळ न भिजवता फक्त १५ मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत मेदूवडा, अगदी सोपी रेसिपी, पाहा VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

ashwinisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साबुदाणा खिचडी मऊ व मोकळी होण्यासाठी टिप्स” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून काही लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहेत.

हेही वाचा : Mango Sheera : यंदा मऊसुत आंब्याचा शिरा खाल्ला का? लगेच ही सोपी रेसिपी नोट करा, पाहा VIDEO

सोशल मीडिया साबुदाणा खिचडी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जातात. काही लोकांना तूपातली खिचडी खायला आवडते तर काही लोकांना तेलापासून बनवलेली साबुदाणा खिचडी बनवायला आवडते. काही लोक आंबटपणा यावा म्हणून खिचडीमध्ये दही सुद्धा टाकतात.