Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा सण असतो. या सणाला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी लोक उपवास करत देवाची आराधना करतात. या उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये, असा प्रश्न अनेकांना पडतो. सहसा आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी करतो पण तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही आषाढी एकादशीला झटपट तयार होणारे उपवासाचे पराठे तयार करू शकता. आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल की हे उपवासाचे पराठे कसे बनवायचे? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे पराठे कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहे. हे पराठे चवीला अप्रतिम वाटतात आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. अगदी झटपट आणि त्वरित होणारा हा पदार्थ आहे.
व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- १ वाटी साबुदाणा
- २ उकडलेले बटाटे
- चवीपुरते मीठ
- जिरे
- कुटलेली हिरवी व लाल मिरची
- कोथिंबीर
कृती
- सुरुवातीला एक वाटी साबुदाणा घ्यावा.
- त्यानंतर साबुदाणा थोडा कमी आचेवर भाजून घ्यावा.
- भाजल्यानंतर साबुदाणा मिक्सरमधून बारी करावा.
- बारीक केलेला साबुदाणा गाळणीने नीट गाळून घ्यावा.
- त्यात उकडलेले दोन बटाटे बारीक करून टाकावे.
- त्यात थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकावे.
- बारीक कुटलेली हिरवी व लाल मिरची टाकावी
- त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- सर्व मिश्रण एकजीव करावे आणि साबुदाण्याचे पीठ मळून घ्यावे.
- त्यानंतर मळलेल्या पिठावर दहा मिनिटे प्लेट ठेवा.
- त्यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पराठा लाटून घ्या.
- एक तवा गरम करा. त्यावर तुप लावून हा पराठा दोन्ही बाजून भाजून घ्या.
- अशाप्रकारे उपवासाचे पराठे तयार होईल.
- या पराठ्यांबरोबर तुम्ही किंवा शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता.
पाहा व्हिडीओ
swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आषाढी एकादशी विशेष झटपट तयार होणारे उपवासाचे पराठे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला करून पाहावी लागेल” तर एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त रेसिपी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुमच्या सगळया रेसिपीज पहिल्या .. अप्रतिम आहेत.. कमी वेळात झटपट… कृती..” ही रेसिपी अनेक युजर्सना आवडली असून एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहेत.