How To Make Sabudana Tokri Chaat : उपवास म्हंटल की, डोळ्यासमोर येतात ते साबुदाण्याचे विविध पदार्थ. साबुदाणा खिचडी, वडे, साबुदाण्याची पेज तर वेगवेगळ्या फळांचं सेवन. अशातच तुम्हाला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलो आहोत, ज्याचे नाव आहे ‘साबुदाणा कटोरी चाट’ (Sabudana Tokri Chaat) . तर आज आपण साबुदाणा कटोरी चाट कशी बनवायची हे पाहुयात…

कटोरी बनवण्यासाठी (Sabudana Tokri Chaat) साहित्य :

How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

१. १.५ कप साबुदाणा (भिजवलेला)
२. एक उकडलेला बटाटा
३. १/४ कप, चिरलेली कोथिंबीर
४. दोन हिरव्या मिरच्या
५. १/२ कप शेंगदाण्याची कूट
६. १/४ कप सिंघाड़ा पीठ (सिंघाड़ा फळाच्या बियांपासून बनवलेलं पीठ)
७. मीठ (सैंधव)
८. दोन चमचे जिरे

कटोरी स्टफिंगसाठी साहित्य :

१. दोन चमचे तेल
२. दोन उकडलेले आणि सोललेले बटाटे
३. एक चमचा जीरा पावडर
४. एक चमचा लाल मिरची पावडर
५. चवीनुसार मीठ

हेही वाचा…Green Soup: संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर खूप भूक लागते? मग प्या भरपूर प्रोटीन असणार ग्रीन सूप; असं करा तयार!

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणा घ्या.
२. त्यात बटाटा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, सिंघाड़ा पीठ, जीरा, मीठ (सैंधव मीठ) टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
३. नंतर एका छोट्या वाटीच्या मागच्या बाजूस तेल लावून घ्या आणि तयार मिश्रण त्याच्यावर चिटकवा.
४. त्यानंतर तेलात वाटी टाका. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुमची कटोरी तयार होईल.
५. त्यानंतर पॅनमध्ये तेल घ्या, त्यात बटाटाट्याचे छोटे तुकडे, जीरा पावडर, लाल मिरची पावडर टाका आणि व्यवस्थित परतवून घ्या.
६. तयार साबुदाणा कटोरीमध्ये फ्राय करून घेतलेला बटाटा, दही, पुदिना चटणी, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे, शेव घाला.
७. अशाप्रकारे तुमची साबुदाणा कटोरी चाट (Sabudana Tokri Chaat) तयार.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आणि ही रेसिपी @chefguntas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

साबुदाण्याच्या सेवनाचे फायदे :

साबुदाणा पचायला हलका असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गॅस आणि अपचन सारख्या समस्यांपासून सुटका होते तर साबुदाण्यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.उपवासाच्या दिवशी शरीरातील वाढलेली उष्णता साबुदाण्याच्या सेवनाने कमी करण्यास मदत होते.साबुदाण्यामध्ये कार्बोहाइड्रेट असतात. कार्बोहाइड्रेट शरीरास ऊर्जा मिळवून देण्यास मदत करतात.

Story img Loader