‘वांगी’ हा भाजीचा असा प्रकार आहे की अनेकजण आवडत नाही म्हणून नाकं मुरडतात. वांग्याची भाजी ताटात वाढलेली बघून आपल्याला जेवण नकोसे वाटते. वांग्यातील त्या लहान – लहान बिया असो किंवा अगदीच मऊ लगदा झालेल्या वांग्याचा फोडी असो, यांसारख्या अनेक कारणांनी आपल्याला वांगे खाणे आवडत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खारा मासा वांग बटाटा भाजी रेसिपी..या पद्धतीनं वागं बनवाल तर नावडतीची भाजीही होईल आवडीची…
खारा मासा वांग बटाटा भाजी साहित्य
- खारा मासा (बांगडा)
- ४ते ५ वांग बटाटा
- १ / २ चमचा आलं लसून पेस्ट,चवी प्रमाणे मीठ –
- १ पळी तेल
- १/ २ग्लास पाणी
- मसाला वाटण -कांदा चिरलेला तव्यावर भाजून घेणे.
- नंतर वाटण करताना त्यात कांदा,टॉमॅटो,कोथंबिर,जिरं, मिर्च पावडर,धना पावडर
खारा मासा वांग बटाटा भाजी कृती
- खारा मासा (बांगडा) काटा काडून घेणे पाण्यात भिजत ठेवणे त्यानंतर तळून घेणे.
- ४ते ५ वांग बटाटा स्वच्छ धुऊन कापुन घेणे.
- मसाला वाटण – १ कांदा चिरलेला तव्यावर भाजून घेणे. नंतर वाटण करताना त्यात कांदा,टॉमॅटो,कोथंबिर,जिरं, मिर्च पावडर,धना पावडर,. १ / २ चमचा आलं लसून पेस्ट,चवी प्रमाणे मीठ
- कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये १ पळी तेल टाका. नंतर त्यात खारा मासा तळून घ्या. व तो काढून त्याच तेलात वाटण टाकून ३ ते ४ मिं हलवून घ्या.
हेही वाचा >> मुळ्यापेक्षाही जास्त गुणकारी आहे मुळ्याचा पाला; चुकूनही फेकू नका, ही रेसिपी करा आणि आयुष्यभर राहा निरोगी
- त्यात वांग व बटाटा टाका व हलवा. त्यानंतर १/ २ ग्लास पाणी टाका. तळून घेतलेला खारा मासा टाका.