पावसाळ्याचा मोसम सुरू असताना नेहमीच काहीतरी गरमागरम, कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. म्हणूनच आजची रेसिपी थोडी खास आहे. झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीने नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग आज दही सँडविच बनवुयात.

दही सँडविच साहित्य

१ वाटी दही

ब्रेड

लोणी

मीठ

काळी मिरी पावडर

चाट मसाला

१ चिरलेला कांदा

टोमॅटो

सिमला मिरची

चिरलेली कोथिंबीर

दही सँडविच बनवण्याची रेसिपी-

दही सँडविच कृती

दही सँडविच बनवणे अगदी सोपे आहे. यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही घ्या. दही पूर्णपणे फेटा. फेटल्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घाला.

सर्व काही मिक्स केल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर आणि थोडा चाट मसाला घाला. पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. शेवटी त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हे मिश्रण लावा. मिश्रण व्यवस्थित लावल्यानंतर दुसरी ब्रेड स्लाइस त्याच्या वर ठेवा.

यानंतर, पॅन गरम करा, त्यावर बटर लावा आणि नंतर सँडविच सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही हे सँडविच तुमच्या मुलाला चहासोबत सर्व्ह करू शकता.

हेही वाचा >> चटकदार चिंचेची कढी; कमी साहित्यात बनेल अशी परफेक्ट कढी

सँडविच करण्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता.