जानेवारी २९ रोजी, सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. या दिवशी अनेकजण उपवास ठेवतात. उपवासादरम्यान साबुदाण्याच्या खिचडीपासून ते बटाट्याची उपवासाची भाजी, वरी तांदूळ आणि दाण्याची आमटी असे पदार्थ हमखास बनवले जातात. मात्र तुम्हाला या दिवशी काही गोड खावेसे वाटत असल्यास, साबुदाण्याची गोड खीर हा पदार्थ एक अत्यंत उत्तम आणि चविष्ट पर्याय ठरू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर @thefoodiewiththebook नावाच्या अकाउंटने या उपवासच्या खीरीची रेसिपी शेअर केली आहे. अगदी मोजक्या गोष्टींचावापर करून हा पदार्थ बनवला जातो. चला तर मग उपवासाच्या खिरीला काय साहित्य लागते ते पाहू. तसेच याची कृती देखील सोप्या पद्धतीने समजून घेऊ.

हेही वाचा : Recipe : उपवासाचा दिवशी बनवून बघ ही कुरकुरीत भजी; काय आहे रेसिपी पाहा…

उपवासाला बनवली जाणारी साबुदाण्याची खीर रेसिपी

साहित्य

तूप
साबुदाणा
काजू
बदाम
बेदाणे
दूध
केशर
साखर
वेलची पावडर

हेही वाचा : Recipe : केवळ १० मिनिटांमध्ये तयार होणारा महाराष्ट्रीयन ‘काकडीचा कोरडा’ कसा बनवायचा? रेसिपी घ्या, बनवून पाहा…

कृती

  • एक कप साबुदाणा स्वच्छ धुवून एक तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावे.
  • आता एका पॅनमध्ये १ चमचा तूप घालून त्यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे आणि बेदाणे परतून घ्या. सुक्यामेव्याचा रंग बदलल्यानंतर पॅनमधील काजू आणि बदाम एका बाऊलमध्ये काढून घ्या.
  • त्याच पॅनमध्ये पुन्हा गरज असल्यास थोडेसे तूप घालून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून एका मिनिटासाठी परतून घ्या.
  • आता या साबुदाण्यामध्ये साधारण १.५ लिटर दूध घालून ढवळत राहा.
  • साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यावा.
  • आता त्यामध्ये केशराचा काही काड्या किंवा इसेन्स घाला.
  • तयार होणाऱ्या खिरीत अर्धा कप साखर घालून खीर पाच मिनिटे मंद आचेवर शिजवत ठेवा.
  • सर्व मिश्रण एकदा ढवळून त्यामध्ये परतलेला सुकामेवा घालावा.
  • सर्वात शेवटी वेलचीची पावडर घालून पुन्हा एकदा खीर व्यवस्थित ढवळून घ्या.
  • तयार आहे आपली उपवास स्पेशल साबुदाण्याची खीर
  • ही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे गरम किंवा गार अशी कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता.

सोशल मीडियावर शेअर झाल्येल्या या रेसिपी व्हिडीओवर आत्तापर्यंत ७.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankashti chaturthi jan 2024 how to make sabudana kheer recipe follow these simple steps dha
Show comments