हिंदू पंचांगांनुसार, कृष्ण पक्षामध्ये चतुर्थीला संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असते. साधारणपणे वर्षामध्ये १२ संकष्ट चतुर्थी असतात. अधिकमास असल्यावर ही संख्या १३ वर जाते. चतुर्थीचा दिवस मंगळवार असल्यास त्याला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ असे म्हटले जाते. प्रत्येक गणेशभक्तासाठी हा दिवस खूप खास असतो. आपल्याकडे बहुतांश लोक चतुर्थीला दिवसभर उपवास करतात. सायंकाळी देवळात जाऊन किंवा घरच्या घरी पूजा करुन उपवास सोडतात. उपवासाच्या दिवशी काही विशिष्ट पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांमध्ये वालाच्या बिरड्याचा समावेश असतो. याच खमंग वालाच्या बिरड्याची सोपी रेसिपी आज तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून घेऊन आलो आहोत .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • एक वाटी मोड आलेले, सोललेले वाल
  • दोन कांदे
  • एक बारीक चिरलेला टॉमेटो
  • एक चमचा जिरे
  • अर्धा चमचा हळद
  • पाव चमचा हिंग
  • दहा ते बारा कढीपत्याची पाने
  • एक चमचा गरम मसाला
  • एक वाटी नारळाचे दूध
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • दोन मोठे चमचे तेल

कृती –

  • एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा.
  • त्यानंतर तेलामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर, हळद इ. घाला.
  • पुढे कांदा, टोमॅटो, वाल, मसाला घाला आणि ते नीट शिजवून घ्या.
  • वाल शिजल्यावर त्यामध्ये एक वाटी घट्ट नारळाचे दूध घाला आणि मिश्रण शिजू द्या.
  • तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालून सजवा.