विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. मात्र इथला सुविख्यात असा “सावजी” प्रकार तिखटच असतो हे अगदी खरे. विदर्भ म्हटलं की सावजी हे नाव हमखास येतच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे.. “सावजी अंडा करी”….बऱ्याच ठिकाणी अंडाकरी करताना उकडलेले अंडे तळून घेतात. मग ते मसाल्यामध्ये घालतात. त्याची सुद्धा एक वेगळीच टेस्ट असते.शेवटी काय पदार्थ एकच असला तरी बनविणारी हात वेगवेगळे आणि प्रत्येकाचा पदार्थ, आवडी-निवडी ह्या वेगवेगळ्या असणारच. आणि असायलाच हव्यात.. नाही का..? चला तर मग पाहुयात सावजी चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास नागपूरचा सावजी अंडा करी….
विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी साहित्य
- ५ उकडून घेतलेले अंडी
- २ टेबलस्पून आले लसुण पेस्ट
- ३ टेबलस्पून खोबराकिस
- २ टेबलस्पून खसखस
- ३ टेबलस्पून शेंगदाणे
- खडा मसाला
- १ मोठी विलायची
- १ दालचिनी
- ७-८ मिरे
- २-३ लवंग
- २ छोटी विलायची
- २-३ तेजपान
- १ स्टारफुल
- १/२ मोठे कांदे बारीक चिरलेले
- १/२ टेबलस्पून सावजी मसाला
- चवीनुसार मीठ
- ६ टेबलस्पून तेल
- ३ टेबलस्पून तिखट
- १ टेबलस्पून धनेपावडर
- १ टेबलस्पून जिरापावडर
- १ टिस्पुन हळद
सावजी अंडाकरी कृती
स्टेप १
अंडे स्वच्छ धुऊन उकळायला ठेवा. बाकीचे साहित्य तयार करून बाजूला ठेवा.
स्टेप २
आता मसाला करण्यासाठी सर्वप्रथम खोबरे, शेंगदाणे, खसखस, कांदा, खडा मसाला हे तव्या वरती भाजुन घ्यावे.
स्टेप ३
भाजलेले सर्व साहित्य मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. लसूण, आले, कोथिंबीर खालून वाटण तयार करून घ्यावे.
स्टेप ४
तयार आहे आपला मसाला,आले-लसूण पेस्ट, उकडलेले अंडे.
स्टेप ५
आता एक पॅन घ्या. त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाले की की त्यात तयार केलेला मसाला घालून दोन मिनिटे होऊ द्या. त्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालून दोन मिनिटे परत परतून घ्या. नंतर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरे पावडर घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. (फोटोत दाखवीले तसे)
स्टेप ६
आता या परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून, चांगली उकळी येऊ द्या. यात उकडून घेतलेली अंडी, सावजी मसाला घालून, झाकण लावून पाच मिनिटे लो फ्लेम वरती उकळी येऊ द्या.
हेही वाचा >> नागपूर स्पेशल सावजी झिंगा फ्राय मसाला; एकदा खाल तर खातच रहाल, ही घ्या सोपी रेसिपी
स्टेप ७
तयार आहे आपली विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी.. वरून कोथिंबीर घालून गरमागरम पोळी सोबत भातासोबत सर्व्ह करा…