सावजी हॉटेलच्या टेस्टनी अख्ख्या नागपूरकरांना वेड लावले आणि सावजी रेसिपीस फेमस व्हायला लागले. काही सावजी हॉटेलला विशेष प्रसिद्धी मिळाली आणि विशेष म्हणजे ज्या कोष्टी बांधवांनी हे सावजी हॉटेल सुरू केले ते सावजी म्हणून ओळखू लागले. चला तर आज सावजी स्पेशल एक नवी रेसिपी पाहुयात. आज आपण पाहणार आहोत टेस्टी सावजी स्पेशल रस्सा/ तर्री. विदर्भात हा रस्सा खूप फेमस आहे कुठल्याही नाष्टा जसे आलुबोंडा मिसळ सोबत हा खाऊ शकतो याची ग्रेव्ही करून ठेवली की कुठल्याही भाजीत व्हेज-नॉनव्हेज सर्व मध्ये टाकू शकतो

सावजी स्पेशल रस्सा/ तर्री साहित्य

  • २ चमचे तीळ
  • २ चमचे धने
  • २ चमचे सोफ
  • १ चमचा खसखस
  • ४-५ लाल मिरच्या
  • २-३ तेजपान
  • १ दालचिनीचा तुकडा
  • ४-५ लवंग
  • ५-६ मिरे
  • १ चमचा तांदूळ
  • १ चमचा चण्याची डाळ
  • १ कांद्याची पेस्ट
  • आले-लसूण पेस्ट
  • १ टेबलस्पून हळद
  • १ टेबलस्पून काळा मसाला
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • २ चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी

सावजी स्पेशल रस्सा/ तर्री कृती

स्टेप १
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे

स्टेप २
नंतर कढई घेऊन त्यात धने सोफ तीळ असे वेगवेगळे भाजून घेणे

स्टेप ३
अशाप्रकारे सर्व मसाल्याचे सामान वेगवेगळे मंद गॅसवर भाजून घेणे

स्टेप ४
एका पातेल्यात पाणी ठेवून गरम करण्यास ठेवणे पाण्याला उकळी आली की सर्व मसाले पाण्यात टाकून घेणे व परत एक उकळी येऊ द्यावी

स्टेप ५
नंतर एक वाटी खाली ठेवून त्यावर चाळणी ठेवावी व सर्व मसाले चाळणीत ओतून घ्यावे. चाळणीच्या साह्याने चाळून घेणे व खाली पाणी जमा करणे. जमा झालेले पाणी फेकून देऊ नये.

स्टेप ६
आता चाळणीत जमा झालेले सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट करून घ्यावी. पेस्ट करतांना बाउलमध्ये खाली जमा झालेले पाणी थोडे घ्यावे.

स्टेप ७
नंतर एक भांडे घेऊन गॅसवर ठेवावे. त्यात दोन चमचे तेल घालून घ्यावे नंतर त्यात कांद्याची पेस्ट घालावी अद्रक लसणाची पेस्ट टाकावी व परतत राहावे.

स्टेप ८
थोड तेलात परतले की त्यात मिक्सरमधून काढलेली पेस्ट टाकावी. मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतावावे नंतर त्यात सर्व मसाले टाकून घेणे. मसाले टाकल्यानंतर थोडे पाणी घालून परतावे.

हेही वाचा >> नागपूरची ओळख झणझणीत ‘सावजी मटण’! एकदा खाल तर खातच रहाल, नोट करा सोपी रेसिपी

स्टेप ९
आता ही आपली ग्रेव्ही तयार झाली आता यात थोडे पाणी घालून उकळू द्यावे. आपला सावजी रस्सा तयार आहे.

Story img Loader