महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात खाद्यसंस्कृतीमध्ये विभिन्नता दिसून येते आणि हिच खाद्यसंस्कृती त्या भागाची ओळख बनते. सातारा हा त्याच्या झणझणीत स्वभावासाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात बननारे पदार्थ हे विशेषत: झणझणीत असतात. बाहेरच्या माणसांना हे पदार्थ खाताना पाण्याचा घोट घेण्याशिवाय काही पर्यात उरत नाही. मात्र, त्याची चवही तितकीच अफलातून असते. अशीच एक चमचमीत गावरान रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया, सातारची चमचमीत गावरान वांगी रेसिपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारी वांगी साहित्य –

  • अर्धा किलो पांढरी छोटी भरायची वांगी
  • अर्धी वाटी तेल, १ वाटी दाण्याचा कूट
  • ५ चमचे लाल तिखट, ३ चमचे मराठा गरम मसाला,
  • चवीनुसार मीठ, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

सातारी वांगी कृती –

वांग्याला अर्धवट चार खाचा पाडा, सगळे साहित्य हाताने छान कालवून घ्या. नंतर त्यात एकत्र केलेला मसाला भरा. कढईत तेल टाकून घ्या. गरम झाल्यावर भरलेली वांगी टाकून त्यावर झाकण ठेवा. झाकणात थोडे पाणी ठेवा व वाफेवर वांगी शिजू द्या, अधून मधून चमच्याने वांगी फिरवा. वांगी शिजल्यावर गॅस बंद करा.

हेही वाचा – बिना तेलाचे टेस्टी छोले, खाल्ले आहेत कधी? ही घ्या ऑइल फ्री रेसिपी

गरमागरम वांगी भाकरी सोबत सर्व्ह करा. ही झणझणीत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते आम्हाला कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara recipe gavran bharleli vangi in marathi srk