सातारा हा त्याच्या झणझणीत स्वभावासाठी ओळखला जातो, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात बननारे पदार्थ हे विशेषत: झणझणीत असतात. बाहेरच्या माणसांना हे पदार्थ खाताना पाण्याचा घोट घेण्याशिवाय काही पर्यात उरत नाही. मात्र, त्याची चवही तितकीच अफलातून असते. अशीच एक चमचमीत गावरान रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया गावाकडं आवडीनं खाल्ली जाणारी अस्सल सातारा स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी कशी बनवतात.
काळ्या घेवड्याची आमटी साहित्य
- २५० ग्रॅम काळ्या घेवडयाचा शेंगा
- १ ते २ कांदे
- ६ ते ७ लसूण पाकळ्या
- ३ ते ४ खोबरेचे तूकडे
- १ टेबल स्पून कोथिंबीर
- ७ ते ८ काढीपते ची पाने
- २ टेबल स्पून शेंगदाणे
- १ टेबल स्पून लाल तिखट
- १ टेबल स्पून गरम मसाला
- २ टेबल स्पून तेल
- १/४ टिस्पून हिंग
- १/४ टिस्पून जिरे
- १/४ टि स्पून मोहरी
- चवीनुसार मीठ घालावे
काळ्या घेवड्याची आमटी कृती –
- काळ्या घेवड्याची डाळ छान शिजवून घ्यावी.
- मग भांड्यात तेल गरम करून जिरे व ठेचलेला लसूण घालून थोडा परतून घ्या,चवीनुसार तिखट व मीठ घाला.
- मग या फोडणीत शिजवलेली घेवड्याची डाळ घालून मिक्स करून घ्या.
- आवश्यकतेनुसार पाणी घाला. उकळी आल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही आमटी खा.
हेही वाचा >> सातारा स्पेशल झणझणीत शेंगदाण्याचा महाद्या! भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत भाजी
- मस्त आमटी तयार आहे ज्वारीची भाकरी बरोबर किंवा भात बरोबर खुप छान लागते.एक बाऊल मध्ये काढून सर्व्ह करावे वरून कोथिंबीर बारीक चिरून घालावी.