नावडत्या भाज्यांमधील हमखास न आवडणारी भाजी म्हणजेच “गवार”.. पण ह्याच नावडत्या भाजी मध्ये थोडासा बदल करून घरातील लोकांना खाऊ घातली तर नक्कीच आवडीने खातील…चला तर मग करुया नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा
नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा साहित्य
- २५० ग्राम गवार शेंग
- १ कांदा चिरलेला
- ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- १ टोमॅटो बारीक चिरलेला
- ५-६ लसूण पाकळ्या
- ७-८ कढीपत्ताची पाने
- १/२ टीस्पून हळद, मोहरी, काळा मसाला/गरम मसाला
- १/४ टीस्पून हिंग
- १ टेबलस्पून तिखट
- १/२ टेबलस्पून जीरे पावडर, धनेपावडर
- १-२ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
- थोडीशी कोथिंबीर
- १/८ कप तेल
- मीठ चवीनुसार
- पाणी आवश्यकतेनुसार
नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा कृती
स्टेप १
गवारच्या शेंगा स्वच्छ धुऊन घ्याव्या. व त्याचे शेवटचे व पहिले टोक तोडून घ्यावे.
स्टेप २
पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाले की, त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, त्यात कढीपत्ता, हिंग, कांदा, हिरव्या मिरच्या घाला. कांदा एक ते दोन मिनिटे चांगल्या परतल्यानंतर त्यात गवाराच्या शेंगा, टोमॅटो घाला व तीन ते चार मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.
स्टेप ३
आता यामध्ये लसूण पेस्ट, तिखट, हळद, धने पावडर, जीरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या. झाकण ठेवून शेंगा शिजवून घ्याव्यात.
स्टेप ४
यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालावे. एक मिनिट होऊ द्यावे.. नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, गरम मसाला घालावा व झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे ही भाजी होऊ द्यावी.
हेही वाचा >> झणझणीत तर्रीवाली विदर्भ स्पेशल सावजी अंडाकरी; एकदा खाल तर खातच रहाल…
स्टेप ५
आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी व गॅस बंद करावा. तयार आहे आपली *नागपुर स्पेशल सावजी गवार शेंगा…ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भातासोबत सर्व्ह करु शकता…