Savji zinga fry masala recipe: बहुतांश मासेप्रेमींना कोळंबीपासून बनवले जाणारे विविध पदार्थ खायला खूप आवडतात. अगदी छोटासा असा हा कोळंबी मासा खूपच चविष्ट असतो. त्यामुळे कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतींनी बनवला जातो. कोळंबीचा रस्सा, कोळंबीचे कालवण, कोळंबी फ्राय, कोळंबी भात असे पदार्थ कोकणात तुम्हाला हमखास खायला मिळतील. दरम्यान, हॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला कोळंबीचे आणखी काही विशेष पदार्थ चाखायला मिळतील. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे झिंगा फ्राय. जेवणात काही नॉनव्हेज बनवण्याचा बेत असेल, तर तुम्ही कोणतेही वाटण न वापरता अगदी १० मिनिटांत कोळंबी मसाला डिश बनवू शकता. चला तर मग आपण झणझणीत झिंगा फ्राय रेसिपी कशी बनवायची सविस्तर जाणून घेऊ…
सावजी झिंगा फ्राय मसाला साहित्य
- १/२ किलो कोलंबी
- १ टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- १ टीस्पून आलं लसूण पेस्ट
- १/२ लिंबाचा रस
- हिरवा मसाला बनवण्यासाठी
- मूठ भर कोथिंबीर
- १ हिरवी मिरची
- १ इंच आलं
- १ गड्डा लसूण
- १ टीस्पून जीरे
- थोडं पाणी
- सावजी वाटण बनवण्यासाठी
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १ तेजपत्ता
- १ टीस्पून खसखस
- ४-५ काळीमिरी
- २ हिरव्या वेलच्या
- १ इंच दालचिनी
- २ टेबलस्पून किसलेलं सुक खोबर
- २-३ सुक्या काश्मीरी लाल मिरच्या
- ३-४ टेबलस्पून तेल
सावजी झिंगा फ्राय मसाला रेसिपी
स्टेप १
सर्वात आधी कोलंबी स्वच्छ निवडून,स्वच्छ करून,धुवून पाणी निथळून घ्या
त्या नंतर त्यात हळद मीठ आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करून घ्या
स्टेप २
हिरव्या वाटनासाठी लागणारे सर्व जिन्नस मिक्सर च्या भांड्यात घालून हिरवे वाटण करून घ्या
स्टेप ३
आता सावजी मसाला बनवून घेऊ,त्या साठी एक पण गरम करून त्यात १ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा, आणि इतर गरम मसाले, सुकं खोबर घालून एकजीव करून घ्या, त्यात काश्मीरी लाल सुक्या मिरच्या घालून परतून घ्या आणि मिश्रण चांगले खरपूस भाजून झाले की ते थंड करून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. (मिश्रण वाटताना गरजेनुसार पाणी वापरा)
स्टेप ४
आता कोलंबी थोड्याश्या तेलात फ्राय करून घ्या
स्टेप ५
आणि त्याच भांड्यात परत थोडं तेल घालून, त्यात हळद,लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या
स्टेप ६
त्यात तयार सावजी वाटण घालून घ्या आणि तेल सुटे पर्यंत मिक्स करा,
स्टेप ७
नंतर त्यात हिरवे वाटण घालून चांगले परंतुन घ्या, ग्रेव्ही तयार आहे
स्टेप ८
त्या नंतर फ्राय केलेली कोलंबी तयार ग्रेव्ही मध्ये सोडून घ्या.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा मटार घेवडा सुकी भाजी; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
स्टेप ९
आणि गरजेनुसार पाणी घालून, आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही छान ढवळून घ्या
स्टेप १०
५ मिनिट कोलंबी वाफेत शिजू द्या, आणि बस खायला तयार आहे गरमगरम
“सावजी झिंगा फ्राय मसाला” चपाती, तांदळाची भाकरी, रोटी बरोबर भन्नाट लागते ही डिश