Schezwan Dosa Recipe In Marathi: महाराष्ट्रात घावण, आंबोळ्या अशा रूपात दाक्षिणात्य पदार्थांचं सेवन फार पूर्वीपासून केलं जात होतं. अजूनही एखाद्या सकाळी असा इडली- घावण्याचा बेत असला की पोटभर खाणं होतं. काळानुसार डोसे सुद्धा मराठी माणसाच्या मनावर राज्य करू लागले. आता तर साध्या डोश्यापासून ते चायनिज चॉप्सी पर्यंत डोश्याचे अनेक प्रकार आले आहेत. अगदी शहरानुरूप मालवणी, कोल्हापुरी डोसे सुद्धा आपल्याकडे केले जातात. आज आपण असाच एका कमाल शेजवान डोसा घरीच कसा बनवायचा हे शिकणार आहोत. मस्त झणझणीत डोश्याने तुम्ही तुमचा दिवस सुरु करू शकता किंवा अगदी डिनरला सुद्धा हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. चला तर मग पाहुयात सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेजवान डोसा साहित्य :

२ कप डोशाचे आंबवलेले पीठ
स्टफिंगसाठी :
१ मध्यम भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
१ मध्यम कांदा, उभा पातळ चिरून
१/२ गाजर, उभे पातळ मॅचस्टिकसारखे काप
१/२ वाटी शिजलेल्या नूडल्स
१ चमचा तेल
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१/२ चमचा किसलेले आले
१/२ चमचा सोया सॉस
१ हिरवी मिरची बारीक चिरून

इतर साहित्य :

शेजवान सॉस, गरजेनुसार
तेल डोसा बनवताना कडेने सोडण्यासाठी

शेजवान डोसा कृती :

सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण आणि मिरची घालून परतावे.

नंतर त्यात भाज्या, नूडल्स घालून मिक्स करावे. सोया सॉस घालून टॉस करावे. मिश्रण बाजूला काढून ठेवावे.

तव्यावर डोशाचे पीठ पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. डोसा वरून सकला की १/२ ते १ चमचा शेजवान सॉस पसरवावा.

हेही वाचा >> स्पेशल पुणेरी ‘मटार उसळ’ एकदा खाल तर खातच राहाल; रविवारी नक्की बेत करा

मधे थोडे सारण पसरवून घ्यावे. एका बाजूने डोसा लालसर झाला की रोल करून डोशाचे २ इंचांचे तुकडे करून सव्‍‌र्ह करावे.