Schezwan Dosa Recipe In Marathi: महाराष्ट्रात घावण, आंबोळ्या अशा रूपात दाक्षिणात्य पदार्थांचं सेवन फार पूर्वीपासून केलं जात होतं. अजूनही एखाद्या सकाळी असा इडली- घावण्याचा बेत असला की पोटभर खाणं होतं. काळानुसार डोसे सुद्धा मराठी माणसाच्या मनावर राज्य करू लागले. आता तर साध्या डोश्यापासून ते चायनिज चॉप्सी पर्यंत डोश्याचे अनेक प्रकार आले आहेत. अगदी शहरानुरूप मालवणी, कोल्हापुरी डोसे सुद्धा आपल्याकडे केले जातात. आज आपण असाच एका कमाल शेजवान डोसा घरीच कसा बनवायचा हे शिकणार आहोत. मस्त झणझणीत डोश्याने तुम्ही तुमचा दिवस सुरु करू शकता किंवा अगदी डिनरला सुद्धा हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. चला तर मग…

शेजवान डोसा रेसिपी

साहित्य :

२ कप डोशाचे आंबवलेले पीठ

Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
How to make Methi Kadhi marathi Methi Kadhi recipe marathi Methi Kadhi recipe
थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ‘ मेथीची कढी’! खास रेसिपी

स्टफिंगसाठी :
१ मध्यम भोपळी मिरची, उभी पातळ चिरून
१ मध्यम कांदा, उभा पातळ चिरून
१/२ गाजर, उभे पातळ काप
१/२ वाटी शिजलेल्या नूडल्स
१ चमचा तेल
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१/२ चमचा किसलेले आले
१/२ चमचा सोया सॉस
१ हिरवी मिरची बारीक चिरून

इतर साहित्य :

शेजवान सॉस, गरजेनुसार
तेल, डोसा बनवताना कडेने सोडण्यासाठी

हे ही वाचा<< दावणगिरी स्टाईल मूग पालक डोसा ठरेल प्रोटीनचा बेस्ट स्रोत; अर्ध्या वाटीत करा झटपट रेसिपी, पाहा

कृती :

१) कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण आणि मिरची घालून परतावे. नंतर त्यात भाज्या, नूडल्स घालून मिक्स करावे. सोया सॉस घालून टॉस करावे. मिश्रण बाजूला काढून ठेवावे.
२) तव्यावर डोशाचे पीठ पसरवून पातळ डोसा घालावा. कडेने तेल सोडावे. डोसा वरून सकला की १/२ ते १ चमचा शेजवान सॉस पसरवावा. मधे थोडे सारण पसरवून घ्यावे. एका बाजूने डोसा लालसर झाला की रोल करून डोशाचे २ इंचांचे तुकडे करून सव्‍‌र्ह करावे.

Story img Loader