सुट्टीच्या दिवशी दुपारी मस्त भाकरी, भात आणि माश्याचे कालवण पोटभर खाऊन, निवांत झोप घेणं यासारखं दुसरं सुख नाही? बरोबर ना? तुम्हालाही सुट्टीचा, आरामाचा दिवस असाच घालवायचा असल्यास झटपट तयार होणारा पापलेट फ्राय कसा बनवायचा ते पाहून घ्या.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर विविध अकाउंटवरून खाद्यपदार्थांच्या रेसिपीचे व्हिडीओ शेअर होत असतात. त्यापैकी @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने अगदी सोप्या पद्धतीने पापलेट फ्रायची रेसिपी व्हिडीओ शेअर केली आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी साहित्य आणि कृती काय आहे ते पाहा.
हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स
पापलेट फ्राय रेसिपी :
साहित्य
तेल
पापलेट
रवा
तांदुळाचे पीठ
आले-लसूण पेस्ट
धणे
लाल तिखट
कोकम आगळ
हळद
मीठ
हेही वाचा : Recipe : पोळीप्रमाणे झटपट लाटा तांदळाची भाकरी; बोनस टीपसह पाहा ‘ही’ सोपी ट्रिक
कृती
सर्वप्रथम पापलेट मासा स्वच्छ साफ करून घ्यावे. त्यानंतर पाण्याने धुवून घ्या.
आता पापलेटला सुरीच्या सहाय्याने चिरा पाडून घ्या.
त्यावर मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घ्यावे.
आता एका वाटीमध्ये आलं-लसूण पेस्ट, हळद, धणे पावडर, लाल तिखट, मीठ आणि दोन चमचे कोकमाची आगळ घालून सर्व गोष्टी एकजीव करून घ्या.
तयार केलेला हा मसाला पापलेटला आणि त्यावर पडलेल्या चिरांमध्ये व्यवस्थित भरून घ्या.
आता एका परातीत रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यामध्ये मसाला लावलेला पापलेट व्यवस्थित घोळवून घ्या. रवा-तांदळाचे कोटिंग माशाच्या सर्व भागाला झाले आहे याची खात्री करा.
आता एका खोलगट पॅनमध्ये पापलेट फ्राय करण्यासाठी तेल तापत ठेवा. मासा तळायचा नसल्याने तेलाचा वापर कमी करा.
तेल तापल्यानंतर त्यामध्ये पापलेट खमंग-खरपूस परतून घ्या.
पापलेटला सोनेरी रंग येईपर्यंत परतून त्यांनतर एका ताटलीत काढून घ्या.
आवडत असल्यास वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाकरी किंवा भाताबरोबर खावे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने ही पापलेट फ्रायची रेसिपी शेअर केली आहे. आत्तापर्यंत या रेसिपी व्हिडीओला ६.९ इमलीयांत इतके व्ह्यूज मिळाले आहेत.