नवरात्रौत्सवादरम्यान प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी देवीची होणारी पूजा-अर्चना आणि मंदिरातील घंटानादामुळे मन प्रसन्न – आनंदी राहतं. अनेक जण निर्जळी उपवास करतात, तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन नऊ दिवसांचा उपवास करतात. प्रामुख्याने साबुदाण्याचे पदार्थ, वरीचे तांदूळ, शेंगदाणे, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ यांसारख्या पदार्थांचे सेवन केलं जातं. तुम्हीही उपवास करणार असाल तर तुमच्यासाठी काही खास रेसिपीज घेऊन आलो आहोत. चला तर पाहुयात उपवासाला बाजरी उत्तपम कसे बनवायचे..
बाजरी उत्तपम साहित्य
- बाजरी
- उडदाची डाळ
- मेथीचे दाणे
- चिरलेला कांदा, हिरवी मिरची
- आले आणि जिरे
बाजरी उत्तपम कृती
- ही डिश बनवण्यासाठी, उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे धुवून घ्या आणि भिजवत ठेवा.
- बार्नियायार्ड बाजरी स्वतंत्रपणे ५-६ तास भिजत ठेवा. नंतर, उडदाची डाळ आणि मेथी दाणे पाण्यातून काढा आणि त्याला बारीक वाटून घ्या.
- त्याच कंटेनरमध्ये, बार्नयार्ड बाजरी बारीक करून घ्या आणि दोन्ही मिश्रण मिक्स करा. त्यानंतर, ते झाकणाने झाकून ठेवा आणि ६-८ तास किंवा रात्रभर आंबू द्या.
- पीठ तयार झाल्यावर त्यात मीठ, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले आणि जिरे मिक्स करावे.
हेही वाचा >> नवरात्रीच्या उपवासाला ‘उपवासाची मिसळ’; एकदा करून तर बघा! उपवासाची चिंताच मिटेल
- नंतर, कढईवर थोडे तेल गरम करा आणि त्यावर पिठ पसरवा. तळ तपकिरी झाल्यावर त्याला पलटवा.
- मध्यम आचेवर आणखी अर्धा मिनिट शिजवा. आपल्या आवडीच्या चटणी बरोबर बाजरी उत्तपम सर्व्ह करा.