नवरात्रीची आज तिसरी माळ आहे, यादरम्यान काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात तर काही वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतात. नवरात्रीच्या उपवासासाठी आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी आहे. उपवासाचे रताळ्याचे कटलेट, चला तर जाणून घेऊयात याची रेसिपी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपवासाचे रताळ्याचे कटलेट साहित्य –

  • १/२ किलो रताळी
  • २ टेबलस्पून हिरव्या मीरचीचा ठेचा
  • २ टेबलस्पून आल्याचा ठेचा
  • २ टेबलस्पून साबुदाणा पीठ
  • २ टेबलस्पून वरीच्या तांदळाचे पीठ
  • १/४ कप शेंगदाण्याचे कुट
  • १ टेबलस्पून मीठ
  • १ टेबलस्पून सैंधव मीठ
  • १ टेबलस्पून जीरे
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १/४ टेबलस्पून पांढरी मिरपूड
  • १ टेबलस्पून तिखट
  • १/२ लिंबाचा रस

उपवासाचे रताळ्याचे कटलेट कृती

  • स्टेप १
    प्रथम रताळी स्वच्छ धुवून ५ मिनीटे पाण्यात उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी किसून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.
  • स्टेप २
    एका भांड्यात रताळ्याचा कीस घालावा. त्यात मीरचीचा व आल्याचा ठेचा घालावा.
  • स्टेप ३
    त्यात तिखट, मिरपूड व मीठ घालावे.
  • स्टेप ४
    जीरे, सैंधव मीठ व शेंगदाणा कूट घालावे.
  • स्टेप ५
    त्यात साबुदाणा पीठ, वरीचे पीठ व कोथिंबीर घालावी.
  • स्टेप ६
    लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. ह्या मिश्रणाचे हवे त्या आकाराचे कटलेट तयार करून घ्यावेत.
  • स्टेप ७
    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात एक-एक करून कटलेट सोडावे व लालसर रंगावर तळून घ्यावेत. तळलेले कटलेट टिश्यू पेपरवर काढून ठेवावे.

हेही वाचा >> घरीच बनवा पाव किलोच्या अचूक प्रमाणात “गरम मसाला”; जाणून घ्या सोपी मराठी पद्धत

  • स्टेप ८
    तयार कटलेट डीश मध्ये काढून हिरव्या चटणी बरोबर खायला द्यावे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardiya navratri 2023 have a feast this navratri with these ratalyache cutlet recipe in marathi srk