नवरात्रीच्या काळात सात दिवस उपवास ठेवत असाल तर अनेकदा काहीतरी हलके फुलके खाण्याची इच्छा होते. अशावेळी उपवासासाठी नेहमी साबुदाणा खाऊन खूप कंटाळा येतो. पण नवीन काय खायचे असा प्रश्न पडतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला साबुदाण्यापासून खिचडी न बनला त्यापासून डोसा कसा बनवायचा जाणून घेऊ, चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ…
साहित्य
१) १५० ग्रॅम साबुदाणा
२) २ चमचे शेंगदाणा कूट
३) ४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
४) चवीनुसार सेंधव मीठ
५) १ टीस्पून काळी मिरी पावडर
६) १ टीस्पून तूप
७) १ छोटा कप पनीर
कृती
सर्व प्रथम साबुदाणा स्वच्छ करून भिजवून घेऊ, यामुळे पीठ बनवणे सोपे होईल. नाहीतर तुम्ही साबुदाणा पावडर बनवू घेऊ शकता. पावडर बनवण्यासाठी तुम्ही मिक्सर जार वापरू शकता. यानंतर एका भांड्यात पावडर काढा आणि हिरव्या मिरच्या धुवून बारीक कापून घ्या. आता त्यात काळी मिरी पावडर , सेंधव मीठ, तूप आणि पाणी असे सर्व साहित्य घाला. त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून एक गुळगुळीत पीठ तयार करा. हे पीठ सुमारे १० मिनिटे ठेवा आणि गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. नंतर चमच्याच्या साहाय्याने पीठ गोल आकारात पसरवा.
आता डोसा शिजायला लागल्यावर उलटा, तूप घालून दुसऱ्या बाजून डोसा नीट शिजवा. डोसा दोन्ही बाजूंनी शिजल्यावर प्लेटमध्ये काढून गरमागरम हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. तुम्ही चटणी आणि सॉससह हा डोसा खाऊ शकता.