Shengdana Chutney : जेवणाचा स्वाद वाढवायचा असेल तर चटणी हा उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा चटणी तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. अनेक जण शेंगदाणा चटणी घरी बनवण्यापेक्षा विकत आणतात पण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी शेंगदाणा चटणी कशी बनवायची, हे सांगणार आहोत. अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही टेस्टी शेंगदाणा चटणी घरीच बनवू शकता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :-

  • शेंगदाणे
  • तिळ
  • खोबरं
  • लाल सुक्या मिरच्या
  • आमचूर पावडर
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला आहात? मग बनवा टेस्टी दही साबुदाणा, सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • शेंगदाणे आणि तिळ खमंग भाजून घ्यावे
  • सुक्या लाल मिरच्या १ चमचा तेलावर त्या थोड्या भाजून घ्याव्यात.
  • खोबरे बारीक किसून घ्यावे आणि चांगले भाजून घ्यावे.
  • भाजलेले शेंगदाणे, तिळ सुक्या लाल मिरच्या आणि खोबऱ्याचा किस एकत्र करावा आणि मिक्सरमधून वाटून घ्यावा
  • त्यात तुम्ही चवीनुसार मीठ आणि आमसूर पावडर टाकू शकता.
  • शेंगदाणा चटणी तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shengdana chutney recipe how to make peanut chutney food news ndj
Show comments