हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. असं होत असेल तर समजा की, तुमच्या पोटातील तापमानात गडबड झाली आहे. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही असा आहार घ्या ज्यात नैसर्गिक तेल आणि पाणी असावे. यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे शेपूची भाजी.

शेपूच्या भाजीचा वापर पूर्वीपासून औषध म्हणून केला जातो. भारतीय घरांमध्ये शेपूचा वापर भाजीसाठीही केला जातो. आवडीने ही भाजी खाल्ली जाते. हिवाळ्यात शेपूची भाजी फारच फायदेशीर मानली जाते. कारण या भाजीमुळे वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत होते. अनेकांना शेपूची भाजी आवडते तर काहींना आवडत नाही. पण हे फायदे वाचल्यावर शेपूची भाजी खाणे नक्कीच सुरु करतील. चला तर मग पाहूयात शेपूच्या भाजीची सोपी रेसिपी..

शेपूची भाजी साहित्य

  • २ पेंडी – शेपूची भाजी
  • १० ते बारा लसूण पाकळ्या
  • ३ हिरवी मिरची
  • १/२ चमचा जीरे
  • १/२ चमचा हळद
  • हिंग
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • २ चमचे तेल
  • २ चमचे मुगाची डाळ

शेपूची भाजी कृती

  • शेपूची भाजी निवडून दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावे त्यानंतर बारीक चिरून घ्या.
  • एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यावे त्यात फोडणी तयार करावी.
  • जीरे हिंग व लसूण लाल झाल्यावर त्यात कांदा व हिरवी मिरची घालून छान परतून घ्यावे.
  • नंतर शेपू आणि मुगाची डाळ घालून पाच मिनिट परतून घ्या. नंतर त्यात हळद घालावी मग परत पाच मिनिट परतून घ्यावे
  • त्यात गरम पाणी घालून चवीपुरते मीठ घालावे व पाच ते दहा मिनिट मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यावे.

Story img Loader