Shev Tomato Bhaji Recipe : सोशल मीडियावर रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक नवनवीन आणि चमचमीत रेसिपी दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शेव टोमेटोची भाजी कशी बनवायची, याविषयी सांगितले आहेत.
तुम्ही आजवर टोमॅटोची भाजी किंवा चटणी खाल्ली असेल पण तुम्ही कधी शेव टोमॅटोची भाजी खाल्ली आहेत का? होय, शेव टोमॅटोची भाजी. चवीला अप्रतिम वाटणारी शेव टोमॅटोची भाजी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे.
दररोज भाजी कोणती करावी? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो किंवा अनेकदा घरात भाजीचे नसते अशा वेळी तुम्ही ही शेव टोमॅटोची भाजी बनवू शकता. लहान मुलांपासून वृद्ध लोकांना सर्वांना ही भाजी आवडेल. लहान मुलांना सकाळी टिफीनवर तुम्ही ही भाजी देऊ शकता. अगदी झटपट होणारी ही भाजी तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल,
शेव टोमॅटोची भाजी कशी बनवायची?
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- जिरे
- आलं लसणाची पेस्ट
- बारीक चिरलेल्या
- बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेला कांदा
- टोमॅटो प्युरी
- तेल
- हळद
- मीठ
- लाल तिखट
- कांदा लसूण मसाला
- शेव
कृती
- सुरुवातीला एक कढई घ्या.
- त्यात तेल गरम करा.
- गरम तेलात जिरे टाका.
- त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाका.
- त्यानंतर बारीक चिरलेले कांदा आणि हिरवे मिरीचे टाका.
- नीट परतून घ्या.
- त्यानंतर कांदा लसूण मसाला, हळद आणि लाल तिखट टाका.
- त्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी टाका.
- चवीपुरते मीठ टाका.
- थोडे पाणी टाका आणि भाजी शिजू द्या
- त्यानंतर बारीक शेव टाका आणि त्यात नीट एकत्रित करा आणि लगेच गॅस बंद करा.
- चमचमीत शेव टोमॅटोची भाजी तयार होईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “घरात भाजीला काही नसेल तेव्हा बनवा ही झटपट शेव टोमेटो ची भाजी” तर एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून तोंडाला पाणी सुटले” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक नंबर रेसिपी आहे. मी नक्की ट्राय करेन” अनेक युजर्सना ही रेसिपी आवडली आहे.