Shevgyachi Chutney Recipe & Benefits: चटणी कोणतीही असो तिची चव कोणत्या भाजीपेक्षा अधिक रुचकर लागते. अनेकदा नावडती भाजीही चटणीच्या सोबतीने पटकन फस्त करता येते. फक्त एक चमचा चटणी संपूर्ण जेवणाची चव द्विगुणित करत असते. याच चटण्या थोड्या विचारपूर्वक आणि योग्य पदार्थ वापरून केल्या तर फक्त चवीलाच नाही तर आरोग्याला सुद्धा हातभार लावू शकतात. सध्या अशाच एक हेल्दी चटणीची रेसिपी सोशल मीडियावर फार ट्रेंड होत आहे. आज आम्ही तुम्हाला याच चटणीची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • शेवग्याच्या पानांची चटणी कशी बनवायची?
  • साहित्य
  • १ कप – शेवग्याची पाने
  • १ टीस्पून – चणा डाळ
  • १ चमचा – उडदाची डाळ
  • १ – लाल मिरची
  • २-३ – लसूण पाकळ्या
  • ५-६ – लहान कांदे
  • ४ चमचे – किसलेला नारळ
  • २ कप – तांदूळ
  • २ टीस्पून -लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल
  • कडीपत्ता
  • चिंचेचा एक छोटा तुकडा
  • चवीनुसार मीठ

रेसिपी

  1. शेवग्याची पाने चांगली स्वच्छ करून घ्या
  2. लोखंडी कढईत शेंगदाणा तेल घाला आणि त्यात उडीद डाळ, चणा डाळ, लाल तिखट आणि कडीपत्ता घालून फोडणी तडतडू द्या.
  3. आता त्यात लसूण, व किसलेले खोबरे घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावे.
  4. शेवटी त्यात चिंच आणि मीठ घाला.
  5. एकदम थंड झाल्यावर पारंपारिक पद्धतीने शक्य असल्यास पाटा वरवंट्यावर वाटून घ्या यामुळे छान दाणेदार चव लागते.
  6. गरमागरम भात आणि तुपाबरोबर ही चटणी खा.

फायदे

शेवग्याच्या शेंगा किंवा पाला हा त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे फायदेशीर मानला जातो. शिवाय या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी हा पाला फायद्याचा ठरू शकतो. काहींना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असते अशावेळी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. शेवग्याचा पाला हा जादुई आहे म्हणायला हरकत नाही. शेवगा हा अत्यावश्यक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे, जो असंख्य आरोग्यदायी फायदे देतो. ‘मोरिंगा थोग्याल’ म्हणजेच शेवग्याच्या पानांची चटणी ही एक पारंपारिक दक्षिण भारतीय रेसिपी आहेत जी पौष्टिक व चविष्ट आहे. शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात. वजन नियंत्रणासाठी या चटणीची मदत होते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shevgyachi chutney recipe benefits how to make moringa leaves chutney moringa leaves dry chutney srk