Drumstick Soup : हिवाळ्यात शेवग्याच्या शेंगा आवजीने खाल्ल्या जातात. शेवग्याची शेंगा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. शेवग्याचा शेंगा खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो, वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत राहतात आणि रक्ताची कमतरता दूर होते. असे अनेक फायदे शेवग्याचा शेंगाचे आहेत पण अनेक जणांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही. तुमच्या घरी सुद्धा काही लोकांनी शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाही का? टेन्शन घेऊ नका कारण शेवग्याच्या शेंगाची ही एक भन्नाट रेसिपी तुमच्या कामी येऊ शकते. तुम्ही शेवग्याच्या शेंगाचे सूप बनवले आहे का? हे सूप बनवायला खूप सोपी आहे. अतिशय पौष्टिक आणि तितकेच चविष्ठ वाटणारे हे सूप लहान मुलांनाही खूप आवडेल. हे सूप कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • शेवग्याच्या शेंगा
  • टोमॅटो
  • कांदा
  • लसूण
  • मिरेपूड
  • लाल मिरची पावडर
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : कुरकुरीत कारल्याची भजी कधी खाल्ली का? एकदा बनवा, सर्वांना आवडेल; पाहा रेसिपी

कृती

  • सुरुवातीला शेवग्याची शेंगाची साल काढून घ्यावी
  • त्यानंतर शेवग्याच्या शेंगा बारीक चिरून घ्याव्यात.
  • कापलेल्या शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा आणि लसूण एकत्रित करा आणि एका कुकरमध्ये पाणी टाकून शिजवून घ्या
  • शेंगा, टोमॅटो ,कांदा आणि लसूण कुकरमध्ये शिजवल्यानंतर त्यातले पाणी काढून टाका आणि शिजलेल्या शेंगा, टोमॅटो ,कांदा आणि लसूण मिक्सरमधून बारीक करा.
  • बारीक करताना कुकरमधून बाजूला काढलेले पाणी त्यात घाला.
  • त्यानंतर बारीक झालेले मिश्रण चाळणीने गाळून घ्या.
  • या मिश्रणाचे सूप बाजूला काढा.
  • त्यानंतर सूप एका कढईत ओतून घ्या
  • ही कढई गॅसवर ठेवा
  • त्या नंतर त्यात मिरेपूड घाला.
  • त्यानंतर लालमिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घाला.
  • त्यानंतर या सूपला उकळी येऊ द्या.
  • उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • गरमा गरम शेवग्याच्या शेंगाचे सूप तयार होईल.
  • हे सूप तुम्ही लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना खायला घालू शकता.
  • हिवाळ्यात असे पौष्टिक सूप पिण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.