आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी शिमला मिर्च, आलू फ्राय भाजी.
शिमला मिर्च, आलू फ्राय साहित्य
- ३ सिमला मिरची,
- ३ बटाटे,
- २ टोमॅटो,
- ३ मिरच्या
- १ सर्व्हिंग स्पून तेल घाला,
- हिंग,
- १ tsp जिरे,
- १ tsp मोहरी आणि
- २ हिरवी मिरची
- ६,७ कढीपत्ता
- १/२ tsp हळद
- १ tsp धणेपूड
शिमला मिर्च, आलू फ्राय कृती
प्रथम तीन सिमला मिरची, तीन बटाटे, दोन टोमॅटो, तीन मिरच्या चिरून घ्या.
नंतर तळण्याचे पॅन गरम करा आणि एक सर्व्हिंग स्पून तेल घाला, नंतर त्यात हिंग, जिरे, मोहरी आणि हिरवी मिरची घाला, कढीपत्ता घाला नंतर हळद आणि धणेपूड घाला, नीट ढवळून घ्या
नंतर चिरलेल्या भाज्या घाला आणि मीठ शिंपडा, चांगले मिक्स करा. नंतर किचन – किंग गरम मसाला शिपडा।
आणि एकदा ढवळून घ्या. आणि झाकण झाकून ठेवा. सिम फ्लेमवर शिजवा.
चार मिनिटांनंतर, ढवळून पुन्हा पाच मिनिटे सिमच्या आचेवर शिजवा. नंतर झाकण उघडा आणि दोन मिनिटे मोकळ्या स्थितीत ठेवा आणि गॅस बंद करा
आणि करी, पराठा बरोबर सर्व्ह करा.