Shravan fasting Recipe : ‘श्रावण पाळणे’ हा प्रकार मांसाहारींना आवडत नसला तरी आणि आठवड्यात सोमवार आणि शुक्रवार, शनिवार असे तीन उपवासांचे दिवस असले तरी त्यानिमित्ताने घराघरांत नैवेद्य, आणि वेगवेगळ्या पदार्थांची चंगळ असते. श्रावणात प्रत्येक सोमवारी, शुक्रवारी, शनिवारी कोणता पदार्थ करायचं हे ठरलेलं असतं. चला तर मग या शनिवारी वरईच्या गरमागरम पुऱ्या ट्राय करा.
वरईच्या गरमागरम पुऱ्या बनवण्यासाठीची साहित्य
- २ मोठी रताळी
- १/२ कप साखर
- १ टीस्पून वेलची पावडर
- १ टेबलस्पून तूप
वरईच्या गरमागरम पुऱ्या बनवायची कृती
- अर्धी वाटी भगर मिक्सर मधून बारीक करुन त्याचे पीठ करुन घ्या.
- भगरीच्या या पिठात १ उकडलेला बटाटा किसून घ्या
- यामध्ये १ चमचा ठेचलेली हिरवी मिरची, मीठ, १ चमचा लाल तिखट घाला आणि सगळे चांगेल मळून घ्या.
- हे पीठ मळताना पाण्याची आवश्यकता लागत नाही. यामध्ये आवडीप्रमाणे थोडे दही, साखर, लिंबू, दाण्याचा कूट, जीरे असे काहीही घालू शकता.
- हे पीठ भिजवल्यानंतर १५ मिनिटे तसेच झाकून ठेवा आणि मग हाताला थोडे पाणी लावून मळून घ्या
हेही वाचा – श्रावण विशेष: उपवासाला कधी पुरणपोळी खाल्ली आहे का? ही घ्या उपवासाच्या पुरणपोळीची सोपी रेसिपी
- एकसारख्या गोलाकार पुऱ्या लाटा आणि कढईतील तेल चांगले गरम करुन या पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्या.
- या पुऱ्या दाण्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, दही, लिंबाचे लोणचे अशा कशासोबतही अतिशय छान लागतात.