Banana Kheer Recipe: हिंदू धर्मातील मान्यतांनुसार श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक पूजा विधी आणि व्रत केले जातात. या संपूर्ण महिन्यात येणार्या सर्व सोमवारी बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात. अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करतात. याच दिवशी अनेक महिला विविध उपवासाचे पदार्थ बनवतात. तर आज आम्ही तुम्हाला उपवासाला केळीची खीर कशी बनवायची हे सांगणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली रेसिपी फॉलो करा.
केळीची खीर साहित्य
- पिकलेल्या १ ते २ केळीचे तुकडे
- दूध – ३ कप
- केशर –
- चवीनुसार गूळ
- वेलची पावडर – अर्धा टीस्पून
- मनुका – ८-१०
- बदाम, काजू – बारीक चिरून
केळीची खीर कृती
- एका भांड्यात दूध घालून उकळू द्या. दूध घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर उकळवा.
- पिकलेली केळी चांगली मॅश करून घ्या.
- आता सर्व ट्राई फ्रूट्स, मनुका दुधात टाका, नंतर एक मिनिट उकळा.
- आता दुधात केशर, वेलची पूड, गूळ घालून आच कमी करा. केशर काही वेळात आपला रंग सोडेल. आता एका भांड्यात मॅश केलेले केळी ठेवा. त्यात उकळलेले दूध घाला. ते चांगले मिसळा.
हेही वाचा – श्रावण विशेष: उपवासासाठी वरईच्या गरमागरम पुऱ्या, १५ मिनिटांत पोटभर-पाैष्टिक फराळ, जाणून घ्या सोपी रेसिपी
- वरून चिरलेली केळी, पिस्ते, काजू, बदाम, केशर यांचे काही तुकडे घालून सजवा. अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी केळ्याची खीर तयार आहे.