Shravan 2023 :श्रावण सुरु होताच गोडधोड करण्याचे अनेक निमित्त मिळतात. अशावेळी नेहमीचेच प्रकार करण्याऐवजी आम्ही अजून एक पर्याय सुचवत आहोत. या श्रावणात अनेक विकारावर उपयोगी तसेच अत्यंत रुचकर अशी भोपळ्याच्या फुलांची भजी ट्राय करा. तुम्हाला पण नक्की आवडेल. पाहुया कृती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • ७ भोपळ्याची फुले
  • १ मोठा कांदा
  • ३ टेबलस्पून बेसन
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टेबलस्पून मिरची पावडर
  • १ टीस्पून मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती –

  • भोपळ्याच्या फुलाचा देठा कडील भाग काढून टाकावा काही वेळा तिथे बारीक कीटक असतात. आणि फुले बारीक चिरून घेवू.
  • त्यात कांदा, मिरची पावडर, हळद, मीठ घालून मिक्स करून घेवू त्यात थोडे थोडे करून बेसन घालावे. कांदा भजी सारखे भरपूर घालू नये. थोडा चिकट होण्या पुरते. पाणी अजिबात घालू नये. फुलाच्या आद्र्रते मुळे पाणी लागत नाही.

हेही वाचा – Shravan 2023 : या श्रावणात बनवा ‘या’ दोन चविष्ट रेसिपी; पाहून तोंडाला पाणी सुटेल

  • आता एका तव्यावर तेल घालून गरम झाल्यावर तयार मिश्रणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून तव्यावर लावून घेवू. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेवू. तयार भोपळ्याच्या फुलाची भजी. गरम गरम सर्व्ह करा. खूप छान लागतात. नक्की ट्राय करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan 2023 shravan festival recipes shravan special recipe bhoplyachya fulachi bhaji recipe in marathi shravan somwar in marathi srk
Show comments