Shravan 2024: उपवासाच्या दिवशी अनेक महिला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा हेच पदार्थ खाऊन संपूर्ण दिवस काढतात. पण काहीवेळा साबुदाण्यामुळे ऍसिडिटी किंवा पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला श्रावणी सोमवारच्या उपवासाला रताळ्याची भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रताळ्याची भाजी साहित्य

२५० ग्रॅम रताळी
२ टेबलस्पून दाण्याचा कूट
२ टेबल्स्पून ओलं खोबरं
४-५ हिरव्या मिरच्या
२ इंच आले बारीक तुकडे करून
कोथिंबीर
फोडणीसाठी तूप जीरे
२ टीस्पून साखर
मीठ चवीनुसार

रताळ्याची भाजी रेसिपी कृती

१. प्रथम भाजी साठी लागणारे सर्व साहित्य एका ठिकाणी करून घ्या. रताळ्याची साले काढून फोडी करा.

२. आता कढईमध्ये तूप घाला. तूप तापले की जीरे घाला, जीरे तडतडल्यावर मिरची, आलं, कोथिंबीर, खोबरं घालून फोडणी व्यवस्थित परतून घ्या.

३. आता यामध्ये रताळ्याच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून दोन-तीन वाफा काढा.

. नंतर भाजी अर्धवट शिजल्यावर यामध्ये मीठ, साखर आणि दाण्याचा कूट घालून भाजी छान शिजवून घ्या.भाजी शिजली की वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घाला.

हेही वाचा >> “भाजणीचे वडे” मंगळागौरीनिमित्त पारंपरिक भाजणीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी

५. तयार झालेली भाजी एका डिशमध्ये काढून सर्व्ह करा..

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan 2024 recipe ratalyache bhaji recipe in marathi shravan naivaidya recipe in marathi srk