श्रावणात पाचूच्या हिरवळीने जसा नेत्रसुखाचा आनंद मिळतो, तसा श्रावण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या संगतीत जिव्हासौख्याचाही अनुभव देतो. पण वर्षागणिक श्रावण साजरा होण्याच्या पद्धतीत बरेच बदल झाले आहेत. हे बदल व्रतवैकल्यांपासून बदलेल्या खाद्यसंस्कृतीपर्यंत घडले आहेत. एकत्र कुटुंब विभक्त झाली. त्यामुळे नव्या पिढीला जुन्या पदार्थांची ओळख करून देणारा काळाचा दुवा नाहीसा झाला आणि त्यात बरेचसे पदार्थही नामशेष झाले.यंदाच्या श्रावणात विस्मरणात गेलेल्या पदार्थांना पुन्हा उजळा देऊन श्रावणाचा खऱ्या अर्थाने आनंद लुटायला हवा.म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी दोन खास पदार्थ घेऊन आलो आहोत. साबुदाणा खीर आणि रताळ्याचा शिरा. चला तर जाणून घेऊया याची रेसिपी

साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य

farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
  • १ वाटी साबुदाणा
  • १ लिटर दूध
  • १ वाटी साखर
  • १ चमचा तूप

कशी बनवावी साबुदाणा खीर

  • खीर करण्यासाठी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन थोडेसे पाणी ठेऊन २-३ तास भिजत घालावा. सुकामेव्याचे तुकडे करुन घ्यावे.
  • आता गॅस सुरु करुन कढई ठेवावी. तूप टाकावे. सुकामेवा टाकावा. सुकामेवा किंचित सोनेरी झाला की भिजलेला साबुदाणा त्यात टाकावा. साबुदाणा त्यात एक ते दीड मिनिटे परतून घ्यावा.
  • आता त्यात पाणी टाकून २-३ मिनीटे शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्यात साखर घालावी. चांगले उकळल्यावर त्यात दुध टाकावे.
  • दुधासह खीर उकळल्यावर त्यात विलायची पुड टाकुन एक उकळी येऊ देवून गॅस बंद करावा. खीरीवर सुकामेवा टाकून आणि आवडत असेल तर तूप टाकून सर्व्ह करावे.

हेही वाचा – शिल्लक चपात्यांपासून १० मिनिटांत करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट – टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन

रताळा शिरा बनवण्यासाठीची सामग्री

  • २ मोठी रताळी
  • १/२ कप साखर
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • १ टेबलस्पून तूप

रताळ्याचा शिरा बनवायची कृती

  • सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्या मग पातेल्यात थोडे पाणी घालून उकळवून घ्या.
  • उकळून झाले की,साल काढून घ्या आणि चाकूने गोल गोल चकत्या करा. त्या चकत्या कढई मध्ये तूप घालून परतून घ्या.
  • परतून झाले की,त्यात साखर आणि वेलची पावडर घाला. मिक्स करून छान शिजू दया.

हेही वाचा – श्रावण सोमवारचा उपवास सोडण्यासाठीची खास स्वीट डिश! २ वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा परफेक्ट मऊ लुसलुशीत “मालपुवा”

  • अगदी छान मऊ शिरा तयार होतो आणि मस्त लागतो.