Shravan Somvar Recipes: श्रावणातल्या सोमवारी महादेवाला वेगवेगळे भोग दिले जातात. आज आम्ही तुम्हाला ज्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. सोपी रेसिपी जाणून घेऊया. चला पाहुयात पनीर जिलेबी कशी बनवायची.
पनीर जिलेबी साहित्य
२०० ग्रॅम पनीर
२०० ग्रॅम मैदा
५० ग्रॅम रवा
१०० ग्रॅम खवा
८ ते १० हिरवी वेलची
१ लिटर साखरेचा पाक
तळण्यासाठी तूप
मिक्स ड्रायफ्रूट्स कापलेले
पनीर जिलेबी कृती
१. जिलेबी बनवण्यासाठी पनीर, मैदा, रवा, खवा या सर्व गोष्टी मिक्स करून याचे घट्ट बॅटर तयार करा. त्यात गरजेनुसार पाण्याचा वापर करा. नंतर हे पीठ स्मूद होईपर्यंत चांगले फेटून घ्या.
२. आता एका कढईत तळण्यासाठी तूप गरम करा. आता हे तयार केलेले बॅटर सॉसच्या बाटलीत टाकून जलेबी बनवा. या जलेबी तुपातून काढून गरम साखरेच्या पाकात टाका आणि काही वेळ भिजत ठेवा.
३. नंतर कापलेल्या मिक्स ड्रायफूट्सने सजवा. तुम्हाला जिलेबीला रंग हवा असेल तर साखरेच्या पाकात १ ते २ पिंच पिवळा खायचा रंग घालू शकता.
४. त्याचबरोबर पाकला चांगला रंग आणि सुगंधासाठी तुम्ही त्यात केशरही घालू शकता. तुमची पनीर जिलेबी तयार आहे.
५. साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात साखर आणि १ कप पेक्षा थोडे जास्त पाणी घाला. नंतर साखर विरघळण्यासाठी २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
हेही वाचा >> Shravan Recipe : तुमचाही श्रावणी सोमवारचा उपवास आहे? मग बनवा चविष्ट बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप
६. पाक तयार झाला की नाही हे तपासण्यासाठी चमच्यावर २ ते ३ थेंब घ्या. थंड झाल्यावर ते बोटात आणि अंगठ्यात चिकटवून ते मधासारखे चिकटले पाहिजे हे पहा.
७. पाकाचे तार बनवण्याची गरज नाही. त्यात केशर घाला आणि तुमचा साखरेचा पाक तयार आहे.