How To Make Farali Puranpoli At Home : श्रावणात मऊ, लुसलुशीत श्रावणात अनेकजण महिनाभर उपवास करतात. सकाळी उपवास धरुन संध्याकाळी सोडतात. त्यातच सोमवारच्या उपवासाचं महत्त्व जास्त. अनेक घरी दर सोमवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर अनेक घरात एका सोमवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून इतर सोमवारी नैवेद्याला विविध पक्वान्नं केली जातात. आपण सहसा उपवास सोडताना पुरणपोळी खातो मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाची पुरणपोळी कशी करायची याची रेसिपी सांगणार आहोत. ही उपवासाची पुरणपोळी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता..चला तर जाणून घेऊया कशी बनवायची ही उपवासाची पुरणपोळी. या उपवासाच्या पुरणपोळीला आपल्या नेहेमीच्या पुराणपोळीसारखा खूप मोठा घाट घालावा लागत नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य –

  • राजगिरा पीठ – १५० ग्रॅम
  • तूप – ३ ते ४ टेबलस्पून
  • मावा – १५० ग्रॅम (किसलेला मावा)
  • बदाम व पिस्त्याचे काप – १ टेबलस्पून
  • वेलची पूड – १/२ टेबलस्पून
  • पिठीसाखर – ३ टेबलस्पून
  • पाणी – गरजेनुसार

कृती –

  • सर्वप्रथम, एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिऱ्याचे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून मऊसूत पीठ मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर ते बाजूला ठेवून द्यावे.
  • एका बाऊलमध्ये किसलेला मावा घेऊन त्यात वेलची पूड, बदाम व पिस्त्याचे काप, पिठीसाखर घालून हे सगळे जिन्नस एकजीव करून त्याचे सारण बनवून घ्यावे.
  • आता राजगिऱ्याच्या मळून घेतलेल्या पिठाचे खोलगट आकाराचे गोळे करून त्यात हे माव्याचे सारण भरून घ्यावे.
  • माव्याचे सारण भरुन घेतल्यानंतर ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यावी.
  • त्यानंतर पॅनवर थोडे साजूक तूप घालून ही उपवासाची पुरणपोळी दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी.

हेही वाचा – श्रावण विशेष: उपवासाला कधी अप्पे खाल्लेत का? ही घ्या टेस्टी बटाट्याच्या अप्प्यांची सोपी रेसिपी

  • गरमागरम उपवासाची पुरणपोळी साजूक तूप घालून खाण्यासाठी सर्व्ह करावी.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan special fasting recipe how to make farali puranpoli at home upvasachi puranpoli srk
Show comments